शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

...अन् सहा मुलींनी दिला आईच्या पार्थिवाला खांदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2019 18:13 IST

गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यात रूढी आणि परंपरेचा पगडा इतर भागापेक्षा जास्त आहे.

- रोशन थोरात 

भेंडाळा (गडचिरोली) : रूढी आणि परंपरेला फाटा देत आपल्या आईच्या पार्थिवाला खांदा आणि मुखाग्नी देण्यापर्यंतचे विधी मुलींनीच पार पाडल्याची घटना चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथे शुक्रवारी (दि.२७) घडली. परिसरात हा चर्चेचा विषय झाला आहे.

गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यात रूढी आणि परंपरेचा पगडा इतर भागापेक्षा जास्त आहे. एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्काराचे सोपस्कार पार पाडण्याची सर्व जबाबदारी रूढीनुसार पुरूषच पार पाडतात. पण भेंडाळा येथे त्याला फाटा देत ६ मुलींनीच आईच्या अंत्यसंस्काराचे सर्व सोपस्कार पार पाडून परंपरेला फाटा दिला.

भेंडाळा येथील पार्वताबाई सावजी डांगे यांचे १०२ व्या वर्षी शुक्रवारी निधन झाले. त्यांचे पती सावजी डांगे यांचे काही वर्षापूर्वीच निधन झाले. त्यांना मुलगा नसून ६ मुलीच आहेत. त्या सर्व वेगवेगळ्या गावांमध्ये राहतात. पार्वताबाईंचे वृद्धापकाळाने निधन झाल्यानंतर त्यांच्यावर अंतिम संस्कार कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे पार्वताबाईच्या अंत्ययात्रेत आकटं पकडण्यापासून तर तिरडीला खांदा देण्यापर्यंत सर्व विधी ६ बहिणींनीच करण्याचा निर्णय घेतला.

पार्वताबाईच्या सर्वात ज्येष्ठ कन्या सुमन मुरकुटे (८६) रा.नागपूर यांनी अंत्ययात्रेत अग्रस्थानी राहून आकटं पकडले, तर सिंधू दहीकर (८१) रा.चंद्रपूर, कमल दहीकर (७५) रा.भेंडाळा, निमा समर्थ (७१) रा.भद्रावती, सुनंदा घुगडे (६८), रा.मूल, रेखा शेंडे (६४) रा.मोहाडी या कन्यांनी खांदा दिला. भेंडाळात पहिल्यांदाच अशा पद्धतीने महिलांनी खांदा दिल्याचे पाहून सर्वांनाच या गोष्टीचे आश्चर्य आणि कौतुकही वाटले.

अग्निसंस्कारही मुलींच्याच हस्तेबहुतांश भागात महिला स्मशानातही जात नाही. पण पार्वताबाईंच्या निधनानंतर त्यांच्या कन्यांसह गावातील काही महिलाही अंत्यसंस्कारासाठी आल्या. या कन्यांनीच पार्वताबाईच्या चितेला मुखाग्नी दिला. भावपूर्ण वातावरणातील या अंत्यसंस्काराप्रसंगी अनेकांचे डोळे पाणावले. पुरूषप्रधान संस्कृतीला फाटा देणाºया या घटनेचा आदर्श इतर गावांनीही घ्यावा, अशा प्रतिक्रिया उमटत होत्या. 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली