शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, आतातरी आमचे वेतन लवकर व नियमित द्या हाे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2022 05:00 IST

गडचिराेली जिल्हास्तरावर दाेन शासकीय रुग्णालये आहेत. तीन ठिकाणी उपजिल्हा रुग्णालये, तर नऊ ठिकाणी ग्रामीण रुग्णालये आहेत. याशिवाय ग्रामीण भागात प्राथमिक आराेग्य केंद्र व उपकेंद्र आहेत. या रुग्णालयांमध्ये राष्ट्रीय आराेग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय हिवताप, कुष्ठराेग निर्मूलन व आराेग्य क्षेत्राशी संबंधित इतर प्रकल्पांमध्येही हे कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांना दरवर्षी ११ महिन्यांचा करार आदेश दिला जाताे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : राष्ट्रीय आराेग्य अभियानांतर्गत आराेग्य सेवा बळकट करण्यासाठी गडचिराेली जिल्ह्यात कंत्राटी स्वरूपात डाॅक्टरांसह जवळपास दीड हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे कंत्राटी कर्मचारी गडचिराेली जिल्ह्यात आराेग्य सेवा देत आहेत. मात्र, त्यांचे वेतन नियमित हाेत नसल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, साहेब, आमचे वेतन लवकर व नियमित द्या हाे, असा टाहाे कर्मचारी फाेडत आहेत. गडचिराेली जिल्हास्तरावर दाेन शासकीय रुग्णालये आहेत. तीन ठिकाणी उपजिल्हा रुग्णालये, तर नऊ ठिकाणी ग्रामीण रुग्णालये आहेत. याशिवाय ग्रामीण भागात प्राथमिक आराेग्य केंद्र व उपकेंद्र आहेत. या रुग्णालयांमध्ये राष्ट्रीय आराेग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय हिवताप, कुष्ठराेग निर्मूलन व आराेग्य क्षेत्राशी संबंधित इतर प्रकल्पांमध्येही हे कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांना दरवर्षी ११ महिन्यांचा करार आदेश दिला जाताे. करार संपल्यानंतर दाेन दिवसांचा खंड देऊन नवीन आदेश दिला जाताे. गडचिराेली येथील दाेन्ही शासकीय रुग्णालयात कंत्राटी डाॅक्टर व आराेग्य कर्मचारी सेवा देत आहेत. या कर्मचाऱ्यांचे मार्च व एप्रिल या दाेन महिन्यांचे वेतन अजूनही मिळाले नाही. आधीच या कर्मचाऱ्यांना मानधन कमी आहे. तेही नियमित व लवकर मिळत नसल्याने हे कर्मचारी आर्थिक अडचणींमुळे चिंताग्रस्त दिसून येत आहेत.  जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेतनाबाबतची कार्यवाही गतीने हाेण्यासाठी नियाेजन करण्याची गरज आहे. 

एप्रिलच्या वेतनासाठी पुन्हा करावी लागणार प्रतीक्षा

-    शासनाकडून जि. प. प्रशासनाला राष्ट्रीय आराेग्य अभियानातील कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठीचे अनुदान मिळाल्याने प्रलंबित असलेले मार्च या एका महिन्याचे वेतन हाेणार आहे. मात्र, एप्रिल महिन्याच्या वेतनासाठी कर्मचाऱ्यांना पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे.-    आराेग्य विभागात विविध पदे रिक्त आहेत. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, प्रयाेगशाळा तंत्रज्ञ, परिचारिका, नर्स, सफाई कामगार आदींसह अनेक पदांचा समावेश आहे. रिक्त पदांवर एनआरएचएम कंत्राटी स्वरूपात कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे.

जि. प.ला उशिरा अनुदान प्राप्तराष्ट्रीय आराेग्य अभियानातील कार्यरत डाॅक्टर व आराेग्य कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी जि. प.च्या आराेग्य विभागाला शासनाकडून अनुदान मिळत असते. गेल्या दाेन महिन्यांपासून यासाठीचे अनुदान प्राप्त न झाल्याने वेतन प्रलंबित राहिले. अलीकडेच जि. प.ला यासाठीचे अनुदान प्राप्त झाले असल्याने येत्या तीन ते चार दिवसांत कंत्राटी आराेग्य कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यात येणार आहे, अशी माहिती जि. प.च्या सुत्रांकडून मिळाली आहे. 

 

टॅग्स :doctorडॉक्टर