शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
5
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
6
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
7
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
8
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
9
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
10
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
11
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
12
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
13
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
14
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
15
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
16
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
17
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
18
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
19
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
20
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

अवैध वाहतूकदारांची चांदीच चांदी

By admin | Updated: June 7, 2014 23:56 IST

छत्तीसगड-महाराष्ट्र सिमेलगत असलेल्या सिरोंचा तालुक्यातील पातागुडम, कोर्ला या दुर्गम गावांमध्ये राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील खासगी वाहतुकदारांना

आसरअल्ली : छत्तीसगड-महाराष्ट्र सिमेलगत असलेल्या सिरोंचा तालुक्यातील पातागुडम, कोर्ला या दुर्गम गावांमध्ये राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील खासगी वाहतुकदारांना सध्या अच्छे दिन आले आहे. मात्र सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला नाहक भुर्दंड बसत आहे. सिरोंचा तालुक्यातील पातागुडम, कोर्ला, सोमनपल्ली, कोपेल्ला हे दुर्गम गाव आहेत. या परिसरातील अनेक लहान गावे या गावांशी जोडलेले आहेत. मोठय़ा लोकसंख्येची ही गाव असून या तुलनेत दळणवळणाचे साधन अत्यल्प आहेत. या भागातील नागरिकांना भाजीपाला व जीवनाश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी मोठय़ा गावात तसेच तालुका मुख्यालयी जावे लागते. मात्र राज्य परिवहन महामंडळाने ऑक्टोबर महिन्यापासून या भागातील बससेवा बंद केली आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल आहे. याचा गैरफायदा खासगी अवैध वाहतुकदार घेत आहेत. १0 किमीच्या अंतरासाठी ३0 रूपये तर ३0 किमीच्या अंतरासाठी ८0 ते १00 रूपयाची आकारणी खासगी वाहतुकदार करीत आहे. राज्य परिवहन महामंडळाची बस १0 आणि ३0 रूपयात एवढय़ा अंतराचा प्रवास करवून देते. खासगी वाहनांच्या टपावर बसूनही प्रवास केला तरी ३५ ते ४0 रूपये प्रवाशांकडून वसूल केले जात आहे. खासगी अवैध वाहतुकदारांची वाहने मोजकी असल्याने व प्रवाशांची संख्या प्रचंड असल्याने खासगी वाहनांच्या दाराला लटकून तसेच टपावर बसून लोक प्रवास करीत आहे. या भागातील लोक प्रतिनिधीचे या समस्येकडे दुर्लक्ष आहे. अनेक प्रवाशांनी राज्य परिवहन महामंडळाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)