शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

सीमेला दारू दुकानांचा वेढा

By admin | Updated: June 21, 2014 23:56 IST

गडचिरोली हा दारूबंदी असलेला राज्यातला दुसरा जिल्हा आहे. मात्र गडचिरोलीत अवैध मार्गाने शेकडो लिटर दारू दररोज विकली जात आहे. दारूबंदी असलेल्या या जिल्ह्याच्या सिमेलगत जवळजवळ

दारूबंदीची जिल्ह्यात ऐसीतैसी : उत्पादन शुल्क विभाग परवाने वितरणासाठी मेहरबानगडचिरोली : गडचिरोली हा दारूबंदी असलेला राज्यातला दुसरा जिल्हा आहे. मात्र गडचिरोलीत अवैध मार्गाने शेकडो लिटर दारू दररोज विकली जात आहे. दारूबंदी असलेल्या या जिल्ह्याच्या सिमेलगत जवळजवळ ३० ते ३५ परवानाप्राप्त दुकान सुरू झाले आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी केवळ कागदावरच उरली आहे. राज्याच्या उत्पादन शुल्क विभाग दारूबंदी जिल्ह्याच्या सीमेवर दारू दुकान व बिअरशॉपी मंजूर करण्याचे काम पुढारपण घेऊन करीत असल्याने गडचिरोली जिल्ह्याचे सामाजिक जीवन धोक्यात आले आहे. १९९३ मध्ये दारूबंदी झालेल्या गडचिरोली जिल्ह्यात आता राजरोस अवैध दारूची विक्री केली जात आहे. या जिल्ह्याच्या चारही सिमालगत परवाना प्राप्त ३० दारू दुकानांचा वेढा पडला आहे. त्यामुळे या भागात जाऊन जिल्ह्यातील दारूडे आपली दारूची भूक भागवून घेत आहे. त्यामुळे सध्यातरी गडचिरोली जिल्ह्याच्या दारूबंदीचे तीनतेरा वाजले आहे. जिल्ह्याच्या सिमेला लागून चंद्रपूर, छत्तीसगड, आंध्रप्रदेश व भंडारा, गोंदिया जिल्ह्याची सीमा आहे. चंद्रपूर, गडचिरोली दरम्यान सावली तालुक्याच्या सीमेत तीन परवाना प्राप्त बीअर बार चालविले जातात. आष्टीजवळ गोंडपिंपरी तालुक्याच्या सिमेत विठ्ठलवाडा, तारसा येथे प्रत्येकी एक तर वैनगंगा नदीच्या तीरावर एक बार व एक देशी दारूचे दुकान सध्या सुरू आहे. तर चंद्रपूर जिल्ह्याच्या सिमेला लागून असलेल्या आरमोरी तालुक्यालगत ७ दुकानाचा वेढा आहे. पाचगाव येथे २ तर गांगलवाडी येथे ३ परमीट रूम, २ बिअर शॉपी आहेत. देसाईगंज तालुक्याला लागून भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर भागात ९ बिअर बार आहे. तर कोरची तालुक्याला लागून गोंदिया जिल्ह्याच्या सिमेत एवढेच परवाना प्राप्त दारू दुकान आहे. सिरोंचा तालुक्याला लागून आंध्रप्रदेशची सीमा आहे. कालेश्वर या आंध्रप्रदेश राज्याच्या गावात तेथील सरकारचे परवाना प्राप्त दारू दुकान आहे. या दारू दुकानदाराने गोदावरी नदीच्या पात्रात विस्तारीत कक्ष म्हणून दारू दुकान सुरू केले आहे. येथून सिरोंचा तालुक्यातील लोक चोरट्या मार्गाने दारू आणतात. राज्याच्या दारूबंदी व उत्पादन शुल्क विभागाने दारूबंदी असलेल्या जिल्ह्याच्या सिमेलगत नवे दुकान सुरू करताना काळजी घेण्याची गरज होती. परंतु दारू विक्रेत्यांच्या लॉबीवर सरकारी यंत्रणा मेहरबान झाली आहे. त्यामुळे राजरोसपणे दारूचे दुकान सिमेलगतच्या भागात सुरू करण्यात येत आहे. गडचिरोली शहरात वास्तव्याला असलेल्या काही दारूतस्करांनी आता सिमेलगतचे बार चालविण्यासाठी घेतले आहे व त्यांच्या धंद्याचा पसारा बंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातही वाढविला जात आहे. गडचिरोली पोलीस व उत्पादन शुल्क विभाग सीमेपार चालणाऱ्या दारूच्या या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरत आहे. काही वर्षांपूर्वी गडचिरोली येथे महिलांच्या संघटनेने दारूबंदीसाठी आंदोलनही केले होते. मात्र आता या संघटनाही या प्रश्नावर मौन बाळगुण आहेत. जिल्ह्याची दारूबंदी हटवावी, अशी मागणी करणारेही महाभाग जिल्ह्यात आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)