शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गाला झुडपांचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 00:28 IST

आरमोरी-गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा अनेक लहान-मोठी झाडे आहेत. परंतु अनेक ठिकाणी बाजूची झुडपे रस्त्यावर आल्याने वळणाऱ्याला विरूद्ध दिशेने येणारे वाहन दिसत नाही. या मार्गावर अपघात होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. राष्ट्रीय महामार्गाला झुडूपांचा वेढा आहे.

ठळक मुद्देअपघात वाढले : नागरिकांच्या मागणीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : आरमोरी-गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा अनेक लहान-मोठी झाडे आहेत. परंतु अनेक ठिकाणी बाजूची झुडपे रस्त्यावर आल्याने वळणाऱ्याला विरूद्ध दिशेने येणारे वाहन दिसत नाही. या मार्गावर अपघात होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. राष्ट्रीय महामार्गाला झुडूपांचा वेढा आहे. त्यामुळे मार्गालगची झुडुपे तोडावी, अशी मागणी केली जात आहे.आरमोरी-गडचिरोली महामार्गावर देऊळगाव, किटाळी, चुरमुरा गावालगत तसेच बाहेर विविध प्रजातींच्या झाडांची झुडपे दिसून येतात. विशेष म्हणजे सदर झुडपे गावालगतच्या रस्त्यावर असल्याने गावातील नागरिकांचेही या मार्गावरून आवागमन असते. विरूद्ध दिशेने येणारे वाहन दिसत नसल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.दरवर्षी झुडपांमुळे अनेक अपघात या गावांलगत घडत असतात. याशिवाय वसा, पोर्ला, मोहझरी, काटली, साखरा तसेच कठाणी नदीलगतचा परिसर ते खरपुंडी फाटा नाक्यापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा झुडपांचा वेढा दिसून येतो.विशेष म्हणजे या राष्ट्रीय महामार्गावरील झुडपे तोडण्याची मागणी अनेकदा संबंधित विभागाकडे करण्यात आली. परंतु दुर्लक्षच झाले. राष्ट्रीय महामार्गाच्या देखभाल दुरूस्तीसाठी शासनाकडून दरवर्षी निधी प्राप्त होतो. परंतु सदर निधी कोणत्या कामावर खर्च केला जातो, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे या मार्गावरील अपघात विरूद्ध दिशेने येणारे वाहन न दिसल्यामुळे घडलेले आहेत.चार वर्षांपासून झाडे तोडण्याची मागणीआरमोरी-गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यालगतची झुडपे तोडण्याची मागणी मागील चार वर्षांपासून संबंधित विभागाकडे आरमोरी येथील सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. परंतु या मागणीकडे कायमच दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. सदर मार्गावरील वाहतूक दिवसेंदिवस वाढत आहे. शिवाय राष्ट्रीय महामार्ग निर्मितीचे काम चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात पोहोचले आहे. आरमोरी येथील बर्डी परिसरात सदर काम पोहोचले आहे. हे काम सुरू झाल्यानंतर लगतची झुडपे तोडली जाऊ शकतात. परंतु या कामाला दीड ते दोन वर्ष लागू शकतात. त्यामुळे तत्काळ या मार्गावरील झुडपे तोडावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुभाष सपाटे यांनी केली आहे.

टॅग्स :highwayमहामार्ग