शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

आता ५ वाजेपर्यंत सुरू राहणार दुकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 5:00 AM

सर्व कँटिन, चित्रपटगृहे, मॉल, व्यायाम शाळा, क्रीडा संकुले, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, सभागृह आदी बंदच राहतील. निवासाची सोय असलेले हॉटेल्स, लॉज, खासगी विश्रामगृहही बंद राहतील. धार्मिक स्थळे नागरिकांकरिता बंद राहतील. पानटपरी आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारी दुकाने बंद राहतील.

ठळक मुद्दे१ ते ३१ जुलैसाठी नवीन निर्देश : रविवारच्या बंदमधून कृषी केंद्रांना वगळले, मास्क नसल्यास दंड

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अनलॉक प्रक्रियेत १ ते ३१ जुलै या कालावधीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन अधिसूचना जाहीर केली आहे. त्यामध्ये जिल्हाभरातील सर्वच प्रकारची दुकाने सोमवार ते शनिवारपर्यंत सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. रविवारला आधीप्रमाणेच सर्व दुकाने बंद ठेवली जातील. मात्र त्यातून कृषी केंद्रांना वगळण्यात आले आहे.सर्व कँटिन, चित्रपटगृहे, मॉल, व्यायाम शाळा, क्रीडा संकुले, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, सभागृह आदी बंदच राहतील. निवासाची सोय असलेले हॉटेल्स, लॉज, खासगी विश्रामगृहही बंद राहतील. धार्मिक स्थळे नागरिकांकरिता बंद राहतील. पानटपरी आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारी दुकाने बंद राहतील. सार्वजनिक ठिकाणी विनामास्क किंवा रूमालविना आढळून आल्यास दंडनिय कारवाई केली जाईल. दैनंदिन बाजार भरविण्यास परवानगी आहे. मात्र आठवडी बाजार भरवता येणार नाही.अंत्यसंस्काराला अजूनही २० पेक्षा जास्त लोकांच्या जमावास परवानगी राहणार नाही. जीवनावश्यक वस्तूंची निर्मिती करणाºया प्रकल्पांना वेळेचे बंधन लागू राहणार नाही. जिल्ह्यातील सर्व रूग्णालये, पॅथॉलॉजी सेंटर, सोनोग्रॉफी सेंटर, केमिस्ट यांना वेळेचे बंधन राहणार नाही.आॅटोरिक्षा, सायकलरिक्षा, चारचाकी वाहनांमध्ये एक चालक व दोन प्रवासी घेऊन वाहतूक सेवा सुरू राहिल. खते, कीटकनाशके, बी-बियाणे यांच्याशी संबंधित उद्योग, दुकाने सोमवार ते रविवार सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहतील. केशकर्तन, हेअर डायिंग, वॅक्सिंग, थ्रेडींग करता येईल. मात्र दाढी किंवा चेहºयाशी संबंधित कामे प्रतिबंधीत राहतील. तशा प्रकारचे फलक ग्राहकांना स्पष्ट दिसेल अशा ठिकाणी लावावे लागणार आहे.केशकर्तनाचे काम करणाºया व्यक्तीने हॅन्डग्लोज, अ‍ॅप्रॉन व मास्क घालणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले. सर्व विभागातील कर्मचाºयांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे.आंतरजिल्हा प्रवासावरील बंदी कायमजिल्ह्यांतर्गत प्रवास करण्यास कोणतेही बंधन राहणार नाही. मात्र एका जिल्ह्यातून दुसºया जिल्ह्यात जाण्यास किंवा येण्यास परवानगीची आवश्यकता अजूनही आहे. जिल्हाधिकारी यांच्या पूर्व परवानगीने प्रशासकीय कारणास्तव प्रवास करता येईल. सक्षम अधिकाºयाची परवानगी घेऊन दुसºया जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करणाºया व्यक्तीला आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार १४ दिवस होम क्वॉरंटाईन किंवा संस्थात्मक विलगीकरणात राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. ५० टक्के प्रवासी घेऊन जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू करण्याची सूचना आहे. मात्र एसटी महामंडळाकडून अजूनही मोजक्याच मार्गावरील काही बसेस सोडल्या जात आहेत.अहेरी व धानोरा तालुक्यात प्रत्येकी एक पॉझिटिव्हधानोरा येथील संस्थात्मक विलगीकरणातील २३ वर्षीय युवकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अहेरी येथील सीआरपीएफ कॅम्पमध्ये नोकरी करणाºया ५२ वर्षीय कर्मचाºयाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हैदराबादवरून आल्यानंतर त्याला संस्थात्मक विलगीकरणात ठेवले होते. अहेरी तालुक्यातील एका रूग्णाची कोरोनापासून मुक्ती झाली आहे.

टॅग्स :Marketबाजार