शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
3
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
4
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
5
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
6
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
7
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
8
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
9
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
10
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
11
गॅस सिलेंडर घेताना या बाबींची करा पडताळणी, टळेल संभाव्य धोका
12
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
13
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
14
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
15
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
16
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
17
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
18
Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!
19
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
20
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता

वजनांचे पासिंग करण्यात दुकानदार आघाडीवर

By admin | Updated: May 6, 2015 01:41 IST

ज्या काट्यावर ग्राहकाला माल वजन करून दिला जातो. यामध्ये दुकानदारांकडून कोणतीही हातचलाखी केली जाऊ नये, ...

गडचिरोली : ज्या काट्यावर ग्राहकाला माल वजन करून दिला जातो. यामध्ये दुकानदारांकडून कोणतीही हातचलाखी केली जाऊ नये, यासाठी वर्षभरातून एकदा वैधमापन शास्त्र विभागाच्यामार्फतीने काट्याचे पासिंग करून घेऊन रितसर प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. इतर जिल्ह्यात ५० टक्केही काटे पासिंग होत नसताना गडचिरोली जिल्ह्यात मात्र हे प्रमाण १०० टक्के आहे. यावरून येथील दुकानदार व ग्राहक जागृक असल्याचे दिसून येत आहे. २०१४-१५ या वर्षात सुमारे तीन हजार ७१२ वजन काट्यांचे पासिंग झाले आहे.माल खरेदी करताना ग्राहकांची फसवणूक होऊ नये, यासाठी दुकानातील प्रत्येक काटा पासिंग करणे बंधनकारक आहे. यासाठी शासनाने वैधमापन शास्त्र विभागाची स्वतंत्र निर्मिती केली आहे. या विभागाच्यामार्फतीने मोठे गाव व शहरांमध्ये एका निश्चित कालावधीनंतर काटे पासिंग शिबिरांचे आयोजन करण्यात येते. पासिंगदरम्यान दुकानदारांकडून आलेल्या वजनांचे वजन योग्य आहे काय, याची तपासणी करून तपासणी योग्य असल्यास सदर वजनावर संबंधित वर्ष टाकल्या जातो. त्यानंतर सदर वजन वैध समजल्या जाते. गडचिरोली जिल्ह्यात अशा प्रकारचे एकूण एक हजार ९२६ वजन काटे आहेत. हे सर्व वजन काटे २०१४-१५ मध्ये पासिंग करण्यात आले आहेत, अशी माहिती सहाय्यक नियंत्रक वैधमापनशास्त्र चंद्रपूर, गडचिरोलीच्या कार्यालयाने दिली आहे. बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर इलेक्ट्रॉनिक काट्यांचाही वापर वाढला आहे. बहुतांश दुकानदार याच काट्यांचा वापर करतात. याही काट्यात फेराफेरी करणे शक्य असल्याने या काट्यांचेही पासिंग दरवर्षी करून प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे. गडचिरोली जिल्ह्यात सुमारे एक हजार ७८६ इलेक्ट्रॉनिक काटे असून या सर्व काट्यांचे २०१४-१५ मध्ये पासिंग झाले आहे. याचा अर्थ गडचिरोली जिल्ह्यातील सर्वच काटे पासिंग आहेत. अलिकडचा ग्राहक जागृक झाला आहे. त्यामुळे दुकानदारही विशेष सावधगीरी बाळगत दरवर्षी काट्यांचे पासिंग करून घेतले जात आहेत. साध्या वजन काट्यांच्या तुलनेत इलेक्ट्रानिक काट्यांमध्ये हेराफेरी करणे कठिण असले तरी ही हेराफेरी सहजासहजी दिसून पडत नाही. त्यामुळे या काट्यांबाबत वैधमापन शास्त्राचे अधिकारी विशेष जागृक असल्याचे दिसून येते. इतर जिल्ह्यांमध्ये वैधमापन शास्त्र विभागाकडे असलेल्या नोंदीच्या तुलनेत अर्धेही काटे दरवर्षी पासिंगसाठी येत नाही. त्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यातील काटे पासिंग समाधानकारकच मानावी लागेल. मात्र दुर्गम भागातील दुकानदार खुलेआमपणे पासिंग न करताच काटे वापरत आहेत, हे सत्यही नाकारता येत नाही. (नगर प्रतिनिधी)