शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

धक्कादायक, आश्रमशाळेत अध्यापनाच्या नावाखाली सहा आदिवासी विद्यार्थिनींची छेड

By संजय तिपाले | Updated: September 13, 2023 21:25 IST

या घटनेने दुर्गम भागातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

गडचिरोली: एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम हालेवारा आश्रमशाळेत  सहा अल्पवयीन आदिवासी मुलींची शिक्षकाने छेड काढल्याची धक्कादायक घटना १२ सप्टेंबरला घडली. तक्रार प्राप्त हाेताच पोलिसांनी गुन्हा नोंदवून शिक्षकाच्या मुसक्या आवळल्या. या घटनेने दुर्गम भागातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रदीप तावडे असे शिक्षकाचे नाव आहे. तो चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. हालेवारा येथे शासकीय आश्रमशाळा असून तेथे आदिवासी मुले- मुली निवासी शिक्षण घेतात. दरम्यान, १२ सप्टेंबरला प्रदीप तावडे सहावीच्या वर्गातील मुलींना अध्यापन करत होता. यावेळी त्याने मुलींच्या जवळ जाऊन त्यांच्याशी आक्षेपार्ह वर्तन केले. सहा मुलींच्या बाबतीत हा किळसवाणा प्रकार घडला. दरम्यान, मुलींनी मोठ्या धाडसाने याबाबत पालकांना कळविल्यानंतर कसनसूर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. त्यानुसार बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, विनयभंग या कलमान्वये प्रदीप तावडेविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर त्यास पोलिसांनी जेरबंद केले.तीन दिवसांची पोलिस कोठडी

दरम्यान,  १३ सप्टेंबरला आरोपी प्रदीप तावडे यास अहेरी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. अधिक तपास कसनसूर ठाण्याचे पोलिस करत आहेत.