शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! दारुविक्रीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर : दारुबंदी असलेल्या गडचिरोलीत दारुतस्करी

By संजय तिपाले | Updated: June 19, 2025 14:39 IST

Gadchiroli : चंद्रपूर जिल्ह्यातील महिला पोलिसांच्या ताब्यात

संजय तिपालेगडचिरोली : दारुबंदी असलेल्या गडचिरोलीत दारुतस्करी, विक्री नवीन नाही. मात्र, दारुची विक्री करण्यासाठी पोटच्या मुलासह इतर काही अल्पवयीन मुलांचा वापर केल्याचे १९ जून रोजी उजेडात आले. याबाबत १८ जून रोजी गडचिरोली ठाण्यात गुन्हा नोंदवून एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलिसांच्या माहितीनुसार, ही महिला मूळची चंद्रपूरच्या सावलीतील रहिवासी आहे. १७ जून रोजी रात्री आठ वाजता जिल्हा रुग्णालयासमोर चंद्रपूर रोडवरील फूटपाथवर दोन व्यक्तींमध्ये हाणामारी सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पो.नि. विनोद चव्हाण यांनी कर्मचाऱ्यांना रवाना केले. यावेळी पोलिसांना पाहून 'दारु का माल लेके भाग..' असे महिलेने एका अल्पवयीन मुलाला सांगितले. त्यानंतर तो दारुची पिशवी घेऊन पळून गेला. दरम्यान, तेथे जावेद खान (रा. गाेकुळनगर, गडचिरोली) याच्या हातात चाकू होता, तो संजय सडमेक (रा . सावली जि. चंद्रपूर) यास मारहाण करत होता. पोलिसांना पाहून जावेद खान जिल्हा परिषदेच्या दिशेने पळाला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करुन त्यास पकडले तर संजय सडमेक किरकोळ जखमी आढळला. त्यास जिल्हा रुग्णालयात उपचार केले. त्यानंतर दोघांनाही ठाण्यात आणले. हवालदार संजय पोल्लेलवार यांच्या फिर्यादीवरुन जावेद खान, संजय सडमेक यांच्याविरुध्द सार्वजनिक ठिकाणी मारहाण करुन शांतता भंग केल्याचा तर महिलेविरुध्द अल्पवयी मुलांकरवी दारुविक्री केल्याचा ठपका ठेऊन गुन्हा नोंदविण्यात आला.

महिला सराईत, डझनभर गुन्हे१७ जून रोजी रात्री ही महिला स्वत:हून पोलिस ठाण्यात आली. तिच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता अल्पवयीन मुलांचा दारुविक्रीसाठी वापर केल्याची कबुली तिने दिली. स्वत:च्या अल्पवयीन मुलासह इतर काही अल्पवयीन मुलांना हाताशी धरुन ती चंद्रपूर मार्गावर हातगाडा लावायची. तेथून ती दारुची विक्री करत असे. ती सराईत असून तिच्यावर दहा ते बारा गुन्हे नोंद आहेत.

न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय आवारातही विक्रीहवालदार संजय पोल्लेलवार यांच्या फिर्यादीनुसार, सदरील महिला अल्पवयीन मुलांकरवी जिल्हा न्यायालय, जिल्हा रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेच्या परिसरातही दारुची विक्री करायची. कुरखेडा न्यायालय आवारात १८ जून रोजी एका वकिलाचा वाहनालक मद्यपान करताना आढळला. त्यानंतर   अल्पवयीन मुलांचा दारुविक्रीसाठी वापर केल्याने  दारुबंदीचे नागडे सत्यही समोर आले आहे. 

टॅग्स :alcohol prohibition actदारुबंदी कायदाGadchiroliगडचिरोली