शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
Sachin Tendulkar, IND vs ENG: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
4
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
5
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
6
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
7
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
8
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
9
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
10
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
11
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
12
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
13
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
14
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
15
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
16
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
17
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
18
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
19
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
20
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...

भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी शिवसेनेची काँग्रेसशी हातमिळवणी

By admin | Updated: November 24, 2015 01:42 IST

कुरखेडा नगर पंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सात जागा मिळाल्या आहे. मात्र स्पष्ट बहुमत न मिळाल्याने

कुरखेडा : कुरखेडा नगर पंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सात जागा मिळाल्या आहे. मात्र स्पष्ट बहुमत न मिळाल्याने येथे भाजपला सत्ता स्थापन करणे कठीण आहे. अशा स्थितीत राज्यात भाजप-सेनेचे सरकार असताना शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी काँग्रेस-राकाँसोबत हातमिळवणी करून नगराध्यक्ष पद पक्षाकडे घेतले आहे. सोमवारी कुरखेडा नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना, काँग्रेस, राकाँ व अपक्ष आघाडीतर्फे डॉ. महेंद्रकुमार मोहबंशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, जि.प.चे उपाध्यक्ष जीवन नाट, काँग्रेस नेते नवनाथ धाबेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस शाम धाईत, अयुब खान, जयंत हरडे, निकेश जांभुळे व अपक्ष गटाचे नेते शफीकुल्ला खान, नगरसेवक पुंडलिक देशमुख, संतोष भटड आदी उपस्थित होते. तर भाजपच्या वतीने मोहम्मद कलाम शेख यांनी नामांकन अर्ज दाखल केला आहे. भाजप उमेदवार कलाम शेख यांचे नामांकन दाखल करताना आमदार क्रिष्णा गजबे, मोतीलाल कुकरेजा, विलास गावंडे, गणपत सोनकुसरे, राम लांजेवार, रविंद्र गोटेफोडे यांच्यासह भाजपचे नगरसेवक उपस्थित होते. कुरखेड्यात काँग्रेस, शिवसेना, राकाँ अशी आघाडी झाल्याने भाजप सत्तेबाहेर जाण्याची शक्यता आहे.चामोर्शीत तीन उमेदवारांचे आठ नामांकन दाखलचामोर्शी नगर पंचायतीचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिलाकरिता राखीव आहे. सोमवारी नगराध्यक्ष पदासाठी तीन नगरसेवकांनी एकूण आठ नामांकन अर्ज दाखल केले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे जयश्री पंकज वायलालवार यांनी चार नामांकन दाखल केले. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रज्ञा धिरज उराडे यांनी दोन तर भारतीय जनता पार्टीतर्फे कविता दिलीप किरमे यांनी दोन नामांकन अर्ज दाखल केले. तिन्ही उमेदवारांचे नामांकन अर्ज वैध ठरविण्यात आले असल्याची माहिती पिठासीन अधिकारी व्ही. एम. तळपादे यांनी दिली आहे. नामांकन अर्ज दाखल करताना सहायक पिठासीन अधिकारी यु. जी. वैद्य, नायब तहसीलदार (निवडणूक) एस. के. चडगुलवार आदी उपस्थित होते.सिरोंचात तीन नामांकन दाखलसिरोंचा नगर पंचायतीचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे. नगराध्यक्ष पदासाठी सोमवारी तीन उमेदवारांनी तीन नामांकन अर्ज दाखल केले. भारतीय जनता पार्टीतर्फे राजू धर्मय्या पेदापल्ली यांनी एक तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सतिश सडवल्ली भोगे, रवीकुमार चंद्रय्या रालाबंडी या दोन उमेदवारांनी प्रत्येकी एक नामांकन अर्ज दाखल केले आहे. यावेळी पिठासीन अधिकारी म्हणून जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) शालिकराम धनकर, तहसीलदार ए. सी. कुमरे, नायब तहसीलदार सत्यनारायण कडार्लावार आदी उपस्थित होते.भामरागडात तीन उमेदवारांचे चार अर्ज दाखलभामरागड नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसतर्फे राजू बंडू वड्डे, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लक्ष्मी श्रीकांत मोडक व भाजपतर्फे कविता संतोष सिडाम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. भामरागडचे नगराध्यक्ष पद अनुसूचित जमातीसाठी राखीव असून कविता संतोष सिडाम यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. हे सर्व अर्ज वैध ठरल्याची माहिती निवडणूक विभागाने लोकमतशी बोलताना दिली.