शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात शिवसेना स्वबळावरच

By admin | Updated: February 8, 2017 02:39 IST

शिवसेना-भाजपचे राज्यात सरकार असले तरी अनेक ठिकाणी दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढत आहे.

जि. प. करिता २५ तर पं. स. करिता ५० जागी उमेदवार रिंगणात गडचिरोली : शिवसेना-भाजपचे राज्यात सरकार असले तरी अनेक ठिकाणी दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढत आहे. गडचिरोली जिल्हाही याला अपवाद राहिलेला नाही. यावर्षीच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेने स्वबळावरच जि. प. करिता २५ जागांवर तर पंचायत समितीकरिता ५० जागांवर लढत असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांनी दिली आहे. २०१२ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना दोन जागांवर विजयी झाली होती. या दोन्ही जागा आरमोरी तालुक्यातील होत्या. मात्र त्यानंतर युवाशक्ती आघाडीचे बहुतांश जिल्हा परिषद सदस्य हे शिवसेनेत दाखल झाले व शिवसेनेचे नेतृत्व पुन्हा सुरेंद्रसिंह चंदेल यांच्याकडे देण्यात आले. त्यानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेने संपूर्ण जिल्ह्यात २५ जागांवर उमेदवार उभे केले आहे. यामध्ये आरमोरी विधानसभा क्षेत्रात १२, गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ७ तर अहेरी विधानसभा क्षेत्रात ६ उमेदवार रिंगणात आहेत. कोरची येथे एका जागेवर कुरखेडा येथे ५, देसाईगंज येथे ३, आरमोरी येथे ३, गडचिरोली येथे २, चामोर्शी येथे ३, मुलचेरा येथे १, अहेरी येथे २, धानोरा २, सिरोंचा १, एटापल्ली तालुक्यात २ जागांवर शिवसेना जिल्हा परिषदेची निवडणूक लढत आहे. तर ५० जागांवर शिवसेनेने पंचायत समितीकरिता उमेदवार उभे केले आहे. २०१२ च्या निवडणुकीत पळसगाव-अरसोडा व इंजेवारी-ठाणेगाव या आरमोरी तालुक्यातील दोन जिल्हा परिषद क्षेत्रातून शिवसेनेने विजय मिळविला होता. शिवसेनेत माजी जिल्हा प्रमुख हरीश मने यांच्या गटाला एक जागा या तिकीट वाटपात त्यांच्या पत्नीसाठी सोडण्यात आली असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेची ताकद आरमोरी विधानसभा क्षेत्रात असली तरी सेनेने यावेळी पहिल्यांदाच २५ उमेदवार मैदानात उतरविले आहे. शिवसेनेकडून विद्यमान जि. प. सदस्य लक्ष्मी मने, प्रा. अशोक इंदुरकर, निरांजनी चंदेल व पद्माकर मानकर या चौघांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. मने आरमोरी, इंदुरकर कुरखेडा, चंदेल धानोरा तर मानकर कोरची तालुक्यातून मैदानात आहे.