शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

‘ती’ झाडे ठरू शकतात अपघातास कारणीभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 01:11 IST

धानोरा-गडचिरोली-मूल-चंद्रपूर-वरोरा-वणी-करंजी या ९३० क्रमांकाच्या नवीन राष्ट्रीय महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र वैनगंगा नदीपासून गडचिरोलीपर्यंत महामार्गावर आणि लगत बनविण्यात आलेल्या कच्च्या रस्त्यांवर तब्बल ११७ झाडे वाहतुकीस अडथळा बनली आहेत.

ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्ग : वन विभागाची परवानगी मिळूनही एफडीसीएमकडून झाडे तोडण्यास चालढकल

दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : धानोरा-गडचिरोली-मूल-चंद्रपूर-वरोरा-वणी-करंजी या ९३० क्रमांकाच्या नवीन राष्ट्रीय महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र वैनगंगा नदीपासून गडचिरोलीपर्यंत महामार्गावर आणि लगत बनविण्यात आलेल्या कच्च्या रस्त्यांवर तब्बल ११७ झाडे वाहतुकीस अडथळा बनली आहेत. ही झाडे तोडण्याची परवानगी वन विभागाने दिली असून त्याची जबाबदारी महाराष्टÑ वन विकास महामंडळाकडे (एफडीसीएम) सोपविली आहे. मात्र एफडीसीएमकडून अद्याप एकही झाड तोडण्यात आलेले नाही. परिणामी वाहनधारकांना करावा लागणारा धोकादायक प्रवास मोठ्या अपघाताला आमंत्रण देत आहे.विद्यमान सरकारने कोट्यवधी रूपये किमतीच्या गडचिरोली जिल्ह्यातून जाणाऱ्या दोन राष्ट्रीय महामार्गांच्या कामास मंजुरी दिली आहे. यामध्ये ९३० क्रमांकाचा धानोरा-गडचिरोली-मूल-चंद्रपूर-वरोरा-करंजी, साकोली-आरमोरी-गडचिरोली-आष्टी-आलापल्ली-सिरोंचा या ३५३ सी क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गाचा समावेश आहे. सदर गडचिरोली-मूलपर्यंतच्या ४३ किमी अंतराच्या मार्गाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण गडचिरोली कार्यालयांतर्गत येते. सदर मार्गाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. चंद्रपूरपासून मूलपर्यंतच्या मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. व्याहाडपासून गडचिरोलीपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाच्या सिमेंट काँक्रीटकरणाचे काम कंत्राटदारामार्फत सुरू आहे. सदर काम टप्प्याटप्प्याने होत आहे. वैनगंगा नदी ते गडचिरोली शहरापर्यंतच्या मार्गावर तसेच लगतच्या कच्च्या रस्त्यावरील मिळून एकूण ११७ झाडे उभे आहेत. सदर झाडांची अद्यापही तोड करण्यात आली नाही. रस्त्यावर झाडे असल्याने वाहनधारकांना वाहन काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. सदर मार्गावर अपघात होऊ नये यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने सर्व झाडांवर लाल पट्टी लावण्यात आली आहे. शिवाय वळणाच्या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असल्याचे फलकही लावण्यात आले आहे. सदर मार्गाच्या जागेची मोजणी करण्यात आली असून या मार्गावरील ११७ झाडे तोडून देण्यात यावी, अशा मागणीचे पत्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने गडचिरोलीच्या मुख्य वनसंरक्षकांना देण्यात आले. त्यानंतर मुख्य वनसंरक्षकांनी सदर झाडे तोडण्याची परवानगी देऊन ही जबाबदारी वन विकास महामंडळाकडे सोपविली आहे. सदर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची देखरेख व प्रत्यक्ष तपासणीची जबाबदारी सरकारने आर. व्ही. कन्सटन्ट हैदराबाद यांच्याकडे सोपविली. सदर कंपनीचे प्रतिनिधी महामार्ग कामाचे पर्यवेक्षण करणार आहेत.देखभालीचा कालावधी चार वर्षाचागडचिरोली-मूल व आरमोरी-गडचिरोली-आष्टी या दोन्ही राष्ट्रीय महामार्गाचे काम संबंधित कंत्राटदाराला वर्क आॅर्डर दिल्यापासून दोन वर्षाच्या कालावधीत पूर्ण करावयाचे आहे. त्यानंतर सदर मार्गाची देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी चार वर्षापर्यंत संबंधित कंत्राटदाराची राहणार आहे. दोन्ही राष्ट्रीय महामार्ग निर्मितीपासून चार वर्ष सुस्थितीत असणे बंधनकारक आहे. त्यापूर्वी सदर मार्गावर खड्डे निर्माण झाल्यास दुरूस्ती करण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची राहणार आहे.नव्याने विद्युतीकरणासाठी पाच कोटीगडचिरोली ते मूल या राष्ट्रीय महामार्गावरील वैनगंगा नदी ते गडचिरोली शहरापर्यंतच्या अंतरावर सदर मार्गावर अनेक वीज खांब व तारा आलेल्या आहेत. सदर वीज खांब काढून राष्ट्रीय महामार्गालगत नव्याने विद्युतीकरण करण्यात येणार आहे. महावितरणने याबाबतचा पाच कोटी रूपयांच्या अंदाजपत्रकाचा प्रस्ताव तयार करून राष्ट्रीय महामार्ग कार्यालय गडचिरोलीकडे सादर केला. सदर कार्यालयाने हा प्रस्ताव रस्ते व परिवहन महामार्ग प्रादेशिक विभाग मुंबई यांच्याकडे मंजुरीसाठी सादर केला आहे. मुंबईच्या कार्यालयाकडून या प्रस्तावास मंजुरी मिळाली नसल्याची माहिती आहे.मुख्य अभियंत्यांनी केली प्रत्यक्ष पाहणीराष्ट्रीय महामार्ग विभाग कोकण भवन मुंबई येथील मुख्य अभियंता विनय देशपांडे यांनी गुरूवारी गडचिरोली जिल्ह्यात दौरा केला. यावेळी त्यांनी मूल ते गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गावर कामाच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. अनेक बाबी त्यांनी यावेळी तपासल्या. सदर महामार्गाचे काम अंदाजपत्रकानुसार व दर्जेदार करण्याच्या सूचना संबंधित कंत्राटदार व कर्मचाºयांना त्यांनी दिल्या.सिरोंचा नजीकच्या प्राणहिता नदीवर पूल बांधकाम सुरू आहे. या बांधकामाचा आढावा देशपांडे यांनी गडचिरोली येथील सर्कीट हाऊसमध्ये घेतला. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.साकोली-आष्टी-सिरोंचा मार्गाच्या कामाची निविदा उघडणारशासनाच्या वतीने साकोली-आरमोरी-गडचिरोली-आष्टी- आलापल्ली-सिरोंचा या ३५३ सी क्रमांकाच्या या राष्ट्रीय महामार्गाचे काम मंजूर केले आहे. गडचिरोली कार्यालयाच्या हद्दित येणाऱ्या गडचिरोली इंदिरा गांधी चौक ते आष्टी इतक्या अंतराच्या मार्गाची संपूर्ण प्रशासकीय व तांत्रिक कार्यवाही प्राधिकरणाने पूर्ण केली आहे. सदर मार्गासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली येत असून टेंडर भरण्यात आले आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निविदा उघडण्यात येणार असून त्यानंतर सदर मार्गाच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात होणार आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग