शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
3
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
4
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
5
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
6
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
7
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
8
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
9
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
10
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
11
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
12
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
13
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
14
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
15
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
16
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
17
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
18
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
19
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
20
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय

शारदा, दुर्गा विसर्जनास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 06:00 IST

आरमोरीचा दुर्गा उत्सव विदर्भात प्रसिध्द आहे. आरमोरी शहरातील पाच ते सहा सार्वजनिक मंडळाने यंदा विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण व आकर्षक देखावे सादर करून भाविकांची गर्दी खेचून घेतली. सायंकाळी ५ वाजतानंतर आरमोरी शहरातील दुर्गा उत्सव पाहण्यासाठी परिसरासह जिल्हाभरातील भाविक व नागरिकांची गर्दी होत होती.

ठळक मुद्देभाविकांची गर्दी : ढोलताशाच्या गजरात निरोप

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात गेल्या १० दिवसांपासून सुरू असेलल्या दुर्गोत्सवाची सांगता झाली. बुधवारी सकाळपासून अनेक ठिकाणी दुर्गा विसर्जन मिरवणुका निघाल्या. विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे, बुधवारपासून शारदा, दुर्गा विसर्जनास प्रारंभ झाला आहे. विसर्जनाच्या पहिल्या दिवशी गडचिरोली, आरमोरी शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात बँड, संदल व ढोलताशाच्या गजरात माताजीला निरोप देण्यात आला.आरमोरीचा दुर्गा उत्सव विदर्भात प्रसिध्द आहे. आरमोरी शहरातील पाच ते सहा सार्वजनिक मंडळाने यंदा विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण व आकर्षक देखावे सादर करून भाविकांची गर्दी खेचून घेतली. सायंकाळी ५ वाजतानंतर आरमोरी शहरातील दुर्गा उत्सव पाहण्यासाठी परिसरासह जिल्हाभरातील भाविक व नागरिकांची गर्दी होत होती. गडचिरोली शहरातही रात्री १०.३० वाजेपर्यंत गरबा, दांडियाची रेलचेल राहत होती. गडचिरोली शहरात दोन दिवस दांडिया, गरबा स्पर्धा आयोजित करण्यात आले. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नवरात्र उत्सवादरम्यान जिल्हाभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. ग्रामीण भागातील काही मंडळांनी महिला व विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा घेतल्या.काही सार्वजनिक शारदा व दुर्गा उत्सव मंडळांनी रक्तदान शिबिर आयोजित करून सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. काही ठिकाणी निवडणुकीसाठी मतदार जागृतीही झाली. नवरात्र उत्सव व विसर्जनादरम्यान पोलीस विभागाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गुरूवारी आणि शुक्रवारी गडचिरोलीसह अनेक ठिकाणी विसर्जन करण्यात येणार आहे.