शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

सावंगीत भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 01:25 IST

तालुक्यातील सावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे येथे उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांना पाणी समस्येचा सामना करावा लागत आहे. सध्या येथे टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

ठळक मुद्देनळयोजना कुचकामी : प्राथमिक आरोग्य केंद्रात आणावे लागते टँकरद्वारे पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : तालुक्यातील सावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे येथे उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांना पाणी समस्येचा सामना करावा लागत आहे. सध्या येथे टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.देसाईगंज तालुक्यातील सावंगी या गावात ग्राम पंचायतची नळ योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. परंतु जलपातळी खालावल्याने पाणी टंचाईचीही समस्या निर्माण झाली आहे. शिवाय गावाच्या वाढत्या लोकसंख्येमुळे जुनीच नळ योजना गावात पाणीपुरवठा करण्यास सक्षम नाही. येथे वाढत्या लोकसंख्येनुसार वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करणे गरजेचे आहे. परंतु नवीन प्रस्तावित नळयोजनेचा प्रस्ताव धूळखात असल्याचे दिसून येते. गावाला भीषण पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत असल्याने सदर आरोग्य केंद्राला नळ योजनेचा लाभ देणे शक्य नाही. यातून मार्ग काढण्यासाठी आरोग्य केंद्रात दोन बोरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र सध्यास्थितीत जलपातळी खालावल्याने बोरही कुचकामी ठरत आहे. येथील आरोग्य केंद्रात वास्तव्यास असलेल्या अधिकारी व कर्मचाºयांनाही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.आरोग्य केंद्रातील पाण्याची ही भीषण समस्या लक्षात घेता यावर मात करण्यासाठी सरपंच राजू बुल्ले यांच्या पुढाकाराने सध्या टॅकरने पाणीपुरवठा केला जात आहे. उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्याने गावातील नागारिकांसह आरोग्य केंद्रातील रूग्णांना जबर फटका बसत आहे. त्यामुळे सावंगी येथे प्रस्तावित नळ योजना तत्काळ कार्यान्वित करावी, तसेच कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.बाहेर जिल्ह्यातील रूग्ण होतात दाखलदेसाईगंज तालुक्यातील महत्त्वपूर्ण आरोग्य केंद्र म्हणून सावंगीची ओळख आहे. या केंद्रांतर्गत सावंगी, गांधीनगर, आमगाव, नवीन लाडज, विसोरा, एकलपूर आदी सहा गावे समाविष्ट असून लगतच्या सोनी, चप्राड, इंदोरा आदी गावातील गरोदर माता येथीलच आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी येतात. प्रसंगी बाळंतपणासाठी गरोदर मातांना आरोग्य केंद्रात भरती राहावे लागत असल्याने भीषण पाणीटंचाईचा येथील रुग्णांनाही जबर फटका बसू लागला आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई