शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
2
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
3
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
4
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
5
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
6
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
7
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
8
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
9
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
10
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
11
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या
12
Viral: बंगळुरुमध्ये घरकाम करणाऱ्या बाईचा पगार ₹४५,०००; महिलेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ...
13
धक्कादायक! पतीशी वाद, रागातून आईकडूनच जुळ्या मुलांची हत्या, स्वत: चौथ्या मजल्यावरुन मारली उडी
14
तंत्र-मंत्र, जारण-मारण, गेंडे आणि म्हशी! आसाममध्ये गूढ जंगलात काळी जादू करणारं गाव
15
राऊत म्हणतात, राज ठाकरे सोबत जाण्यास इच्छूक; पण काँग्रेस नेते म्हणाले, मनसेबाबत चर्चा नाही!
16
टॅक्स फ्री ४० लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत दरमहा इतके गुंतवा अन् कोट्यधीश व्हा
17
४ मुली पदरात, नवऱ्याने सोडलं पण 'तिने' धाडस केलं; सुरू केला व्यवसाय, आता लाखोंची मालकीण
18
भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार...
19
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला

जिल्ह्यात सात हजार नागरिक हत्तीरोगाने पीडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 06:00 IST

हत्तीरोग क्युलेक्स या प्रकरातील डास चावल्यामुळे होतात. सदर डास बुचेरेरीया बॅनक्रॉप्टीया हे परजीवी जंतू मनुष्याच्या शरीरात चावा घेतेवेळी सोडतो. अशा प्रकारे हत्तीरोगाचे जंतू मानवाच्या शरीरात प्रवेश करतात. हत्तीरोगाच्या संसर्गजन्य जंतंूनी शरीरात प्रवेश केल्यानंतर ८ ते १६ महिन्यांच्या कालावधीनंतर लक्षणे दिसायला लागतात.

ठळक मुद्देजुलैत झाले होते सर्वेक्षण : इतर जिल्ह्यांच्या तुलनेत प्रमाण अधिक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा हत्तीरोग कार्यालयाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात हत्तीरूग्णांची (फायलेरीया) संख्या सुमारे ६ हजार ८८९ एवढी आढळून आली आहे. विशेष म्हणजे, राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात हत्तीरूग्णांची संख्या अधिक असल्याने आरोग्य विभागही चिंतेत पडला आहे.हत्तीरोग क्युलेक्स या प्रकरातील डास चावल्यामुळे होतात. सदर डास बुचेरेरीया बॅनक्रॉप्टीया हे परजीवी जंतू मनुष्याच्या शरीरात चावा घेतेवेळी सोडतो. अशा प्रकारे हत्तीरोगाचे जंतू मानवाच्या शरीरात प्रवेश करतात. हत्तीरोगाच्या संसर्गजन्य जंतंूनी शरीरात प्रवेश केल्यानंतर ८ ते १६ महिन्यांच्या कालावधीनंतर लक्षणे दिसायला लागतात.हत्तीपायाचे लक्षणे दिसण्याच्या चार अवस्था मानल्या जातात. पहिल्या अवस्थेत जंतूचा शिरकाव झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला लक्षणे दिसून येतात. दुसऱ्या अवस्थेत रूग्णाच्या रात्रीच्या रक्तनमुन्यात मायक्रो फायलेरिया आढळून येतात. मात्र रूग्णामध्ये या रोगाची कोणतीही लक्षणे आढळून येत नाही. तिसºया अवस्थेत ताप, रसीकाग्रंथींना सूज दिसून येते. चौथ्या अवस्थेत हात, पाय व बाह्य जनिंद्रीयावर सूज दिसून येते.हत्तीरोग व मलेरिया हे डासांनी होणारे आजार आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील वातावरण डासांसाठी पोषक असल्याने या दोन्ही रोगांचे रूग्ण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय व आरोग्य विभागामार्फत प्रतिबंधात्मक अनेक उपाय केले जातात.यामध्ये मच्छरदाण्यांचे वितरण करणे, फवारणी करणे, गप्पी मासे सोडणे, आदींचा समावेश आहे. या सर्व उपायानंतरही मलेरिया व फायलेरिया या रोगांच्या रूग्णांमध्ये भरच पडत चालली आहे. जिल्हा हत्तीरोग अधिकारी कार्यालयाच्या वतीने १५ ते ३० जुलै या कालावधीत सर्वेक्षण करण्यात आले होते. या कालावधीत जुने व नवीन असे एकूण ६ हजार ८८९ रूग्ण आहेत.प्रतिबंधात्मक उपाययोजना आवश्यकहत्तीरोग होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे. यामध्ये घरासभोवताल तसेच गावात डासांची पैदास होणार नाही, यासाठी विशेष काळजी घेणे. घाण, कचरा यांची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावणे. खड्डे, सखल जागा मातीचा भराव टाकून बुजविणे. डासांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करणे. रात्री झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे आवश्यक आहे. जिल्हा हत्तीरोग विभाग तसेच आरोग्य विभागाच्या वतीने याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जात असली तरी नागरिक योग्य ती उपाययोजना करीत नसल्याने जिल्ह्यात फायलेरिया रूग्णांची संख्या अधिक आढळते. हत्तीरोग होऊ नये, यासाठी सर्व नागरिकांना वर्षातून एकदा डीईसी गोळ्या दिल्या जातात. या गोळ्यांचे प्रत्येक नागरिकाने सेवन करणे आवश्यक आहे.हत्तीरोग झालेल्या व्यक्तीचा पाय सूजतो तर काही नागरिकांची अंडवृध्दी होते. अंडवृध्दी झालेल्या नागरिकांचे ऑपरेशन करता येते. अंडवृध्दी झालेल्या नागरिकांनी ऑपरेशनसाठी जवळपासच्या प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्रात संपर्क साधावा.- डॉ. कुणाल मोडक,जिल्हा हत्तीरोग नियंत्रण अधिकारी, गडचिरोली

टॅग्स :Healthआरोग्य