शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्त सात हजार शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 06:00 IST

हलके व मध्यम कालावधीचे धान कापले होते. जड धान निसवले होते. अशावेळी आठ दिवस दमदार पाऊस झाला होता. या पावसाने अनेक शेतकऱ्यांचे उभे धान कोसळले तर कापलेल्या धानाच्या कडपा ओल्या झाल्या. यामुळे सर्वच धानाचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतांची पाहणी करून प्रशासनाने अहवाल तयार केला. त्यामध्ये जिल्हाभरातील २५ हजार ९३९ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याने ते मदतीस पात्र ठरले.

ठळक मुद्देअवकाळी पावसाचा फटका : १८ हजार ७१९ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली मदत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या शेतकºयांना शासनाने आर्थिक मदत जाहीर केली होती. २० डिसेंबरपर्यंत १८ हजार ७१९ शेतकऱ्यांना ९ कोटी ८२ लाख ४३ हजार रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे. अजुनही ७ हजार २२० शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.हलके व मध्यम कालावधीचे धान कापले होते. जड धान निसवले होते. अशावेळी आठ दिवस दमदार पाऊस झाला होता. या पावसाने अनेक शेतकऱ्यांचे उभे धान कोसळले तर कापलेल्या धानाच्या कडपा ओल्या झाल्या. यामुळे सर्वच धानाचे मोठे नुकसान झाले.नुकसानग्रस्त शेतांची पाहणी करून प्रशासनाने अहवाल तयार केला. त्यामध्ये जिल्हाभरातील २५ हजार ९३९ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याने ते मदतीस पात्र ठरले. त्यासाठी १२ कोटी ४९ लाख १९ हजार २३८ रुपयांच्या अनुदानाची आवश्यकता होती. शासनाने पहिल्या टप्प्यात ३ कोटी ४० लाख ६७ हजार तर दुसºया टप्यात ७ कोटी ४४ लाख ११ हजार असा एकूण १० कोटी ८४ लाख ७८ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला. शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकºयांना तो वितरित करण्याच्या कामाला सुरूवात झाली. २० डिसेंबरपर्यंत १८ हजार ७१९ शेतकऱ्यांना ९ कोटी ८२ लाख ४३ हजार २३९ रुपयांचे अनुदान वितरित झाले आहे. हे प्रमाण ९०.५७ टक्के एवढे आहेत. उर्वरित अनुदान वितरणाचे काम सुरू आहे. उर्वरित अनुदान शासनाने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे.शासनाकडून पावणेदोन कोटी अप्राप्तनुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत वितरित करण्यासाठी १२ कोटी ४९ लाख १९ हजार २३८ रुपयांच्या अनुदानाची गरज होती. त्यापैकी शासनाकडून दोन टप्प्यात १० कोटी ८४ लाख ७८ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला. अजुनही १ कोटी ६४ लाख ४१ हजार २३८ रुपये अनुदानाची गरज आहे. शासनाकडून सदर निधी उपलब्ध झाला नसल्याने काही शेतकऱ्यांना वेटींगवर ठेवण्यात आले आहे. उर्वरित निधी प्राप्त झाल्यानंतरच वितरणाला सुरूवात होईल. शासनाने सदर निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी