शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सात हजार लाभार्थ्यांवरच पेन्शन योजना अडकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 06:00 IST

खासगी क्षेत्रात सेवा देणाऱ्या तसेच असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगाराला कामबंद होताच आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे सरकारने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले. या वर्गाला वयोवृध्द कालावधीत थोडाफार आर्थिक स्त्रोत मिळत राहिल्यास त्यांचे जीवन सुखकर होण्यास मदत होईल, ही बाब लक्षात घेऊन केंद्र शासनाने २०१५ मध्ये अटल पेन्शन योजना सुरू केली.

ठळक मुद्देप्रचार-प्रसार थंडावला : असंघटित क्षेत्रातील नागरिकांसाठी लाभदायक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : असंघटित क्षेत्रातील कामगार, व्यापारी तसेच शेतकरी वर्गाला पेन्शनचा लाभ मिळावा, यासाठी केंद्र शासनाने अटल पेन्शन योजना २०१५ मध्ये सुरू केली. शासनाच्या दबावामुळे सुरूवातीला या योजनेचा प्रचार, प्रसार मोठ्या प्रमाणात करण्यात आला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लाभार्थी या योजनेत सहभागी झाले. त्यानंतर मात्र शासन व प्रशासनाने या योजनेकडे दुर्लक्ष केल्याने आता या योजनेचा विस्तार कमी झाला आहे. जिल्हाभरातील केवळ ७ हजार ४०५ लाभार्थ्यांनी अटल पेन्शन योजनेचा लाभ घेतला आहे.खासगी क्षेत्रात सेवा देणाऱ्या तसेच असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगाराला कामबंद होताच आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे सरकारने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले. या वर्गाला वयोवृध्द कालावधीत थोडाफार आर्थिक स्त्रोत मिळत राहिल्यास त्यांचे जीवन सुखकर होण्यास मदत होईल, ही बाब लक्षात घेऊन केंद्र शासनाने २०१५ मध्ये अटल पेन्शन योजना सुरू केली. या योजनेंतर्गत ज्या व्यक्तीचे बँक खाते आहे, अशा व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येते. १८ ते ४० वयोगटातील असंघटीत क्षेत्रातील नागरिक या योजनेचे लाभार्थी बनू शकतात. वार्षिक ४२ रुपये ते १४५४ रुपये असा लाभार्थीच्या वयानुसार हप्ता ठरतो.जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्र शासनाचा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर बराच दबाव होता. त्यामुळे बँकेत येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला बँकेचे कर्मचारी योजनेविषयी माहिती देत होते. तसेच तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक हे सुध्दा योजनेच्या प्रचार प्रसाराच्या कामाला लागले होते. २०१५ नंतर भाजप सरकारने अनेक योजना सुरू केल्या. त्या योजनांवर प्रशासनाचे लक्ष केंद्रीत झाले. अटल पेन्शनकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या वाढण्यावर मर्यादा येत आहेत. मागील चार वर्षाच्या कालावधीत या योजनेचा लाभ केवळ ७ हजार ४०५ लाभार्थ्यांनी घेतला आहे.योजनेच्या विस्ताराची गती मंदावली असल्याचे दिसून येते. असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी अत्यंत चांगली योजना आहे. मात्र योजनेकडे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येत आहे.योजनेची वैशिष्ट्येया योजनेंतर्गत लाभार्थ्याला वार्षिक हप्ता केवळ ४२ रुपये ते १४५४ रुपये एवढा भरायचा आहे. १८ ते ४० या वयोगटातील नागरिक या योजनेचे लाभार्थी होऊ शकतात. वयानुसार हप्त्याची रक्कम बदलते. जेवढे वय अधिक तेवढी हप्त्याची रक्कम अधिक राहते. लाभार्थ्याला ६० वर्ष वयानंतर मासिक एक हजार रुपये ते पाच हजार रुपये मासिक पेन्शन देण्याची तरतूद आहे. तसेच वारसदाराला १.७ लाख रुपये ते ८.५ लाख रुपये दिले जातील.

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतन