शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

आणखी सात जणांनी केली कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 05:00 IST

जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत त्या ७ जणांना प्रोत्साहन देण्यासाठी टाळ्यांचा गजर करत दवाखान्यातून घरी सोडण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. घरी सोडण्यात आलेले हे सातही जण एटापल्ली तालुक्यातील आहेत.

ठळक मुद्दे२० रुग्ण बाधित : १९ जण झाले कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात गुरूवारी (दि.४) एका कोरोनारुग्णाची भर पडल्यामुळे आतापर्यंतच्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४० वर गेली आहे. मात्र याचवेळी गुरूवारी ७ लोकांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत सुटी झालेल्यांची संख्या आता १९ झाली आहे.जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत त्या ७ जणांना प्रोत्साहन देण्यासाठी टाळ्यांचा गजर करत दवाखान्यातून घरी सोडण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. घरी सोडण्यात आलेले हे सातही जण एटापल्ली तालुक्यातील आहेत. आता २० रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. एका रुग्णाचा गेल्या १ जून रोजी हैदराबाद येथे मृत्यू झाला आहे.दरम्यान क्षयरोगाच्या चाचणीत वापरल्या जाणाऱ्या निदान यंत्रांचा वापर कोविड-१९ तपासणी करण्यासाठी आयसीएमआरकडून नुकतीच परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातही या प्रकारच्या चाचणीला परवानगी देण्यात आली. त्याची सुरूवात नवीन प्रयोगशाळेत करण्यात आली.प्रयोगशाळेचे उद्घाटन, ५० मिनिटात अहवालजिल्हा सामान्य रुग्णालयात ट्रूनॅट कोविड-१९ तपासणी प्रयोगशाळेचे उद्घाटन पालकमंत्री विजय वडेट्टीवार आणि जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या हस्ते झाले. या प्रयोगशाळेत कोरोना पॉझिटिव्ह नसल्यास तसा अहवाल मिळेल. मात्र रु ग्णाला कोविड-१९ ची बाधा झाल्याची खात्री होण्यासाठी नागपूर येथेच संशयिताचे नमुने पाठविण्यात येणार आहेत. त्यामुळे नागपूरला नमुने पाठविण्याचा ताण कमी होणार आहे. कोरोना संसर्ग झाला नसल्याचे निदान केवळ ५० मिनिटांमध्ये होणार आहे. जिल्हयातील जास्त जोखमीच्या रूग्णांचे अहवाल या प्रयोगशाळेत तात्काळ स्वरूपात तपासता येतील. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या