शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

सेतू भारतम् योजना रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 5:00 AM

साकोली-वडसा-गडचिरोली-चामोर्शी राज्य मार्ग ३५३ सीचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला होता. २ जानेवारी २०१६ ला तांत्रिक निविदा उघडली होती. राष्ट्रीयमहामार्गाच्या नूतनीकरणासाठी १६२.२२ कोटी निधी मंजूर होता. सदर काम पावसाळ्यासह तीन महिन्यात पूर्ण करावयाचे होते. परंतु हे काम अद्यापही कासवगतीने सुरूच आहे. सदर मार्गाला शहरी भागातून की बायपास असे दोन प्रस्ताव जनतेसमोर ठेवण्यात आले होते. राष्ट्रीय महामार्ग नेमका किती मीटर रूंद राहणार, याबाबतही नागरिकांमध्ये शंका आहे.

ठळक मुद्देचार वर्ष उलटले : देसाईगंजात बायपास की फ्लॉयओव्हर याबाबत संभ्रम

लोकमत न्यूज नेटवर्कसावंगी : साकोली-वडसा-गडचिरोली-चामोर्शी-आष्टी-आलापल्ली-रेपनपल्ली-सिरोंचा या नवघोषित राष्ट्रीय महामार्गाचे रस्ते परिवहन व राष्ट्रीयमहामार्ग मंत्रालयाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्गाचा शुभारंभ ११ मार्च २०१६ ला पंतप्रधानांच्या हस्ते झाला. सेतू भारतम् योजना म्हणून थाटामाटात योजना सुरू करण्यात आली. परंतु चार वर्षांचा कालावधी उलटूनही अद्यापही कामाला सुरूवात झाली नाही. त्यामुळे देसाईगंज शहरात बायपास मिळणार की फ्लॉयओव्हर याबाबत संभ्रम आहे.साकोली-वडसा-गडचिरोली-चामोर्शी राज्य मार्ग ३५३ सीचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला होता. २ जानेवारी २०१६ ला तांत्रिक निविदा उघडली होती. राष्ट्रीयमहामार्गाच्या नूतनीकरणासाठी १६२.२२ कोटी निधी मंजूर होता. सदर काम पावसाळ्यासह तीन महिन्यात पूर्ण करावयाचे होते. परंतु हे काम अद्यापही कासवगतीने सुरूच आहे. सदर मार्गाला शहरी भागातून की बायपास असे दोन प्रस्ताव जनतेसमोर ठेवण्यात आले होते. राष्ट्रीय महामार्ग नेमका किती मीटर रूंद राहणार, याबाबतही नागरिकांमध्ये शंका आहे.भूमिगत रेल्वे पुलाच्या अप्रोच रस्त्यावरून केवळ दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, कार आदी वाहने आवागमन करू शकतात. रेल्वे पुलाची उंची ३.६० मीटर असल्याने येथून मोठी उंच वाहने जाऊ शकत नाही. वडसा-वडेगाव रेल्वे स्टेशनजवळील रेल्वे फाटक २४ जुलै २०१७ पासून देसाईगंज-साकोली राष्ट्रीय महामार्ग कायम बंद करून नवनिर्मित भूमिगत पुलावरून मर्यादित उंचीच्या उपमार्गावर दळणवळण वळते करण्यात आले होते. परंतु येथून मोठी व जड वाहने आवागमन करू शकत नाही. त्यामुळे वडसा-ब्रम्हपुरी रेल्वे मार्गावरील विर्सी कब्रस्तान शासकीय विश्रामगृहाकडे निघणाऱ्या राज्य महामार्गावरून वाहतूक वळविण्यात आली आहे. परंतु सदर मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था आहे.देसाईगंज येथील वाढती वाहतूक लक्षात घेता शहरात फ्लॉयओव्हर निर्माण करण्याची नितांत आवश्यकता आहे. केंद्र सरकारने केलेल्या घोषणेची पूर्तता कधी होणार, याकडे देसाईगंज शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.१० ते १२ वेळा प्रभावित होते वाहतूकदेसाईगंज येथील बायपास की फ्लॉयओव्हर हा मुद्दा सध्यातरी संपुष्ठात आलेला नाही. साकोली-देसाईगंज-गडचिरोली-चामोर्शी-आष्टी-आलापल्ली-रेपनपल्ली-सिरोंचा या राज्य मार्गाला ३५३ सी राष्ट्रीय महामार्ग घोषित करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे हस्तांतरीत करण्यात आले आहे. देसाईगंज शहर चांदाफोर्ट-गोंदिया-वडसा रेल्वे क्रॉसिंगमुळे दोन भागात विभागल्या गेला आहे. एका भागात रहिवासी तर दुसºया भागात मुख्य बाजारपेठ आहे. परिणामी रहिवासी भागात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना बाजार परिसरात वारंवार कामानिमित्त जावे लागते. मात्र शहराच्या मधोमध दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे लाईन गेल्यामुळे दिवसातून १० ते १२ वेळा रेल्वे फाटक बंद होते. नागरिकांना ताटकळत राहावे लागते.आत्तापर्यंत केंद्र शासनाने देसाईगंज शहराला बायपास अथवा फ्लॉयओव्हरसाठी प्रशासकीय मान्यता दिलेली नाही.- संजीव जगताप, उपकार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग कार्यालय, भंडारा.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा