शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

देसाईगंजात ४२ प्रकरणांचा निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 00:12 IST

राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये देसाईगंज येथील न्यायालयात राष्ट्रीय शनिवारी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. न्यायालयात प्रलंबित दिवाणी व फौजदारी तसेच प्रीलिटीगेशनचे मामले ठेवण्यात आले होते.

ठळक मुद्देलोकअदालत। वादी-प्रतिवादी यांच्यामध्ये घडवून आणली तडजोड

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये देसाईगंज येथील न्यायालयात राष्ट्रीय शनिवारी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. न्यायालयात प्रलंबित दिवाणी व फौजदारी तसेच प्रीलिटीगेशनचे मामले ठेवण्यात आले होते. यापैकी ४२ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.लोक अदालत देसाईगंज येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायमूर्ती ए.आर.भडके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होती. यात देसाईगंज न्यायालयात न्यायप्रविष्ठ १३ व प्रीलिटीगेशनचे २९ प्रकरणे, अशा एकूण ४२ प्रकरणांचा निपटारा सामंजसपणे करण्यात आला.यावेळी देसाईगंज येथील समाजसेवक जी.एम.कांडलकर,अ‍ॅड.संजय गुरू, अ‍ॅड.वारजूरकर, अ‍ॅड.मंगेश शेंडे, अ‍ॅड.किशोर चोपकार, अ‍ॅड.अविनाश नाकाडे, अ‍ॅड.लॉंगमार्च खोब्रागडे, अ‍ॅड.दत्ता पिलारे, अ‍ॅड.नेहा इलमुलवार, अ‍ॅड.तारिक सौदागर व अन्य सामाजिक कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, नगर परिषद टॅक्स, बँकांचे थकित कर्ज प्रकरण तसेच दिवाणी व फौजदारी अशा ४२ प्रकरणाचा निपटारा सामंजस्याने निकाली काढण्यात आला.लोक अदालतीच्या वेळी नगर परिषद कर विभाग प्रमुख अनिल दुधे, विदर्भ कोकण ग्रामीण बँक व्यवस्थापक नागेश फुले, एमएसईबीचे उपविभागीय अभियंता घनशाम साळवे उपस्थित होते. लोकअदालत यशस्वी करण्यासाठी सहायक अधीक्षक अंबागडे, स्टेनो सुनिल कनोजिया, वरिष्ठ लिपिक रवी मानुसमारे, विजय कावळे, मुकेश कावळे, विशाल नंदगीरवार, राजेंद्र कोलते, माधुरी आवळे, कोर्ट मोरर बालाजी ठाकरे, प्रवीण मेश्राम यांनी सहकार्य केले.न्यायालय तारखांवर तारखा देत असल्याने पक्षकार व विरोधी पक्षाचेही वेळ, पैसा व श्रम वाया जातो. यावर उपाय म्हणूून तडजोडणीने प्रकरणे निकाली काढण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले जाते. दिवसेंदिवस लोकअदालतींना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत चालला आहे. विशेष करून प्रशासन व खासगी व्यक्ती यांच्यामध्ये असलेली प्रकरणे निकाली काढण्यावर पॅनलमार्फत विशेष भर दिला जातो.

टॅग्स :Lokadalatलोकअदालत