शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

लोकअदालतीत ३३ प्रकरणांवर तोडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 00:31 IST

जिल्हाभरातील न्यायालयांमध्ये शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. गडचिरोली व चामोर्शी येथील लोकअदालतीत ३३ प्रकरणांवर तोडगा काढण्यात आला.

ठळक मुद्देगडचिरोली व चामोर्शी येथे न्यायनिवाडा : २३ लाख ७९ हजार रूपयांच्या प्रकरणांचा निपटारा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हाभरातील न्यायालयांमध्ये शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. गडचिरोली व चामोर्शी येथील लोकअदालतीत ३३ प्रकरणांवर तोडगा काढण्यात आला.गडचिरोली येथील राष्ट्रीय महालोकअदालतमध्ये १८ लाख ८४ हजार ५१७ रूपयांची एकूण १८ प्रलंबित प्रकरणे तसेच २० हजार ३१५ रूपयांची ९ दाखलपूर्व प्रकरणे निकाली काढली. असे एकूण १९ लाख ४ हजार ८३२ रूपयांची २७ प्रकरणे निकाली काढली. गडचिरोली येथील लोकअदालतीला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष संजय मेहरे यांच नियंत्रणाखाली विधी सेवा प्राधिकरणचे सचिव डी. जी. कांबळे यांच्या मार्गदर्शनात लोक न्याय अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.जिल्हा न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी पॅनल क्रमांक १ चे पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले. तर दिवानी न्यायाधीश तथा मुख्य न्याय दंडाधिकारी बी. एम. पाटील यांनी पॅनल २ चे प्रमुख म्हणून काम पाहिले. लोकअदालत यशस्वी करण्यासाठी न्यायालयातील वकील, कर्मचारी यांनी सहकार्य केले.चामोर्शी न्यायालयाने काढली ४ लाख ७५ हजार रूपयांची प्रकरणे निकालीचामोर्शी : तालुका विधी सेवा समिती चामोर्शीच्या वतीने दिवानी व फौजदारी न्यायालय चामोर्शी येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले होते. या लोकअदालतीत चामोर्शी न्यायालयाचे दिवानी स्वरूपाचे १६, फौजदारी स्वरूपाचे ३० व ७९ दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. ग्राम न्यायालय मुलचेराची पाच दिवानी व फौजदारी स्वरूपाची प्रकरणे ठेवली होती. त्यापैकी दोन दिवानी व चार फौजदारी प्रकरणात आपसी समजोता करण्यात आला. या निकालांमध्ये ४ लाख ७५ हजार रूपयांची वसुली करण्यात आली. अदालतीमध्ये पॅनल प्रमुख म्हणून सहदिवानी न्यायाधीश तथा प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी लि.दा. कोरडे तर पॅनल सदस्य म्हणून अ‍ॅड. प्रेमा आर्इंचवार, सामाजिक कार्यकर्ता प्रमोद वायलालवार यांनी काम पाहिले. लोकअदालतीकरिता तालुका अधिवक्ता डी. व्ही. दोनाडकर, ए. जे. उंदीरवाडे, के. टी. सातपुते, डिम्पल उंदीरवाडे, एम. के. आठमाडे, पी. एम. धाईत, एस. एम. रॉय, एम. डी. सहारे उपस्थित होते. यशस्वीतेसाठी व्ही. एस. महल्ले, वरिष्ठ लिपीक पी. डी. कोसारे, कनिष्ठ लिपीक नेताजी करंबे, सुधाकर भिसे, विनायक सहारे, मेश्राम, राहूल रोकडे, संतोष चलाख, आर. एस. लहानगडे यांनी सहकार्य केले.

टॅग्स :LokadalatलोकअदालतCourtन्यायालय