शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गौण वनौपज संकलन २० केंद्रे स्थापन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 00:05 IST

मागील वर्षी स्थापन करण्यात आलेला गौण वनोपज संकलन केंद्राला चांगला प्रतिसाद मिळाल्याने यावर्षी २० गौण वनोपज संकलन केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय महिला आर्थिक विकास महामंडळ व आदिवासी विकास महामंडळ यांच्या बैठकीत घेण्यात आला.

ठळक मुद्देआढावा बैठकीत निर्णय : वर्षभरात १ लाख १७ हजारांची वनौपज खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील वर्षी स्थापन करण्यात आलेला गौण वनोपज संकलन केंद्राला चांगला प्रतिसाद मिळाल्याने यावर्षी २० गौण वनोपज संकलन केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय महिला आर्थिक विकास महामंडळ व आदिवासी विकास महामंडळ यांच्या बैठकीत घेण्यात आला.महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने महिलांना स्वावलंबी व आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध उपाययोजना करीत आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी एकत्र येऊन अनेक महिला स्वत:चे उद्योग व्यवसाय स्थापन केले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात मोठ्या प्रमाणात गौण वनोपजाचे उत्पादन होते. वनोपज गोळा करण्याचे कौशल्य येथील नागरिकांना पिढीजात प्राप्त झाले आहेत.शेतीचा हंगाम संपल्यानंतर वनोपज गोळा करण्यावरच येथील नागरिक विशेष भर देतात. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे वनोपज गोळा होते. मात्र अधिकृत खरेदीदार नसल्याने विक्रीच्या समस्या निर्माण होते. याचा गैरफायदा काही व्यापारी उचलतात. गावात जाऊन अगदी कवडीमोल भावाने वनोपज खरेदी केले जाते. ही बाब महिला व आर्थिक विकास महामंडळाच्या लक्षात आल्यानंतर बचत गटांच्या मार्फत वनोपज संकलन केंद्र चालू करण्याचा निर्णय घेतला.मागील वर्षी पाच संकलन केले सुरू केले होते. या केंद्रांच्या माध्यमातून आजपर्यंत वर्षभरात १ लाख १७ हजार ४१४ रुपयांचे वनोपज गोळा करण्यात आले आहे.संकलन केंद्रांची संख्या वाढल्यास स्थानिक महिलांना रोजगार मिळेल, तसेच वनोपजालाही भाव मिळेल, या उद्देशाने २० संकलन केंद्र स्थापन केले जाणार आहे.कामाचा आढावाआदिवासी विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय गडचिरोली येथे १६ एप्रिल रोजी आढावा बैठक पार पडली. या बैठकीला महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कांता मिश्रा, प्रादेशिक व्यवस्थापक जयप्रकाश राजुरकर, प्रतवारी कार अण्णासाहेब पवार, उप महाव्यवस्थापक जयंत उमाडे, उपप्रादेशिक व्यवस्थापक राजपूत, चारूदत्त वाढई आदी उपस्थित होते. या बैठकीत संकलन केंद्र निर्माण करण्याचा निर्णय घेतला. सदर संकलन केंद्रावर आवक वाढावी, यासाठी ग्रामीण भागात जनजागृती करण्याच्या दृष्टीनेही चर्चा झाली. गौण वनोपजाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होणार आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग