गडचिरोली : विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून बुधवारी गडचिरोली व आरमोरी येथे स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला घेऊन पान, फूल, स्टिकर आंदोलन करण्यात आले. शेकडो विदर्भवादी कार्यकर्त्यांनी मुख्य चौकात उभे राहून वाहनांना स्वतंत्र विदर्भ राज्य समितीचे स्टिकर चिपकविले, तर वाहनचालकांना व नागरिकांना फूल आणि पान देऊन त्यांचे स्वागतही केले. गडचिरोली येथे इंदिरा गांधी चौकात दुपारी १२.३० वाजता या आंदोलनाला सुरूवात झाली. यावेळी भाजपचे जिल्हा महामंत्री रमेश भुरसे, भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष रोहिदास राऊत, पांडुरंग घोटेकर, प्रा. अशोक लांजेवार, पांडुरंगजी भांडेकर, दत्तात्रय बर्लावार, राजू पाटील जक्कनवार, सुधाकर नाईक, जनार्धन साखरे, संतोष बोलुवार, प्रभाकरराव बारापात्रे, जीवन गोडे, जीवनदास मेश्राम, सिध्दार्थ नंदेश्वर, किशोर मेश्राम, गुरूदास चुधरी, पारडीचे उपसरपंच काशिनाथ नागोसे, राजू तोंडरे, प्रकाश जुवारे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. आरमोरी येथे वडसा टी पार्इंटवर आंदोलन करण्यात आले. नागपूर व देसाईगंजवरून येणाऱ्या अनेक वाहनांना स्टिकर लावून वाहनचालकांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आरमोरी येथे शालिकपाटील नाकाडे, उकाजी चिळंगे, भाग्यवान कुकडकार, राजेंद्रसिंह मडकाम, सतिश निकोडे, गिरिधर बान्ते, गोविंदा तुराम, नयन सेलोकर, बाजीराव आचले आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
स्वतंत्र विदर्भाचे स्टिकर वाहनांना लावले
By admin | Updated: April 2, 2015 01:45 IST