लोकमत न्यूज नेटवर्कराजाराम खांदला : अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या खांदला ग्रामपंचायतीला प्रती शेकडा ४०० रूपये व राजाराम ग्रामपंचायतीला प्रती शेकडा ४५० रूपये तेंदूपत्त्याचा भाव मिळाला आहे.खांदला ग्रामपंचायतीत पहिल्या दोन लिलावामध्ये एकही कंत्राटदार हजर झाला नाही. तिसऱ्या लिलावादरम्यान ग्रामस्थांनी १६०० रूपये प्रती शेकडा भाव ठेवला होता. मात्र कंत्राटदाराने एवढा भाव देण्यास नकार दिला. शेवटी ४०० रूपये प्रती शेकडा भाव ठरविण्यात आला. ग्रामसभेला खांदला येथील सरपंच शकुंतला कुळमेथे, पंचायत समिती सदस्य भास्कर तलांडे, उपसरपंच गुरूदास पेंदाम, सदस्य वंदना अलोणे, सुधाकर आत्राम, दुर्गा आलाम, नारायण आत्राम, सदू पेंदा, माधव कुळमेथे, सचिव एस. शेडमाके हजर होते. राजाराम ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेला सरपंच विनायक आलाम, सदस्य सत्यवान आलाम, नारायण कंबगोणीवार, सतीश सडमेक, आनंद वेलादी, नागेश् कन्नाके, अनिता आलाम, पुष्पा तौरेम, शारदा आलाम यांच्यासह गावकरी हजर होते.
अत्यल्प भावात तेंदूपत्त्याची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 01:41 IST
अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या खांदला ग्रामपंचायतीला प्रती शेकडा ४०० रूपये व राजाराम ग्रामपंचायतीला प्रती शेकडा ४५० रूपये तेंदूपत्त्याचा भाव मिळाला आहे.
अत्यल्प भावात तेंदूपत्त्याची विक्री
ठळक मुद्देलिलाव : राजारामला ४५० तर खांदलाला ४०० रूपये शेकडा भाव