शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

कपड्यांच्या आड दारूविक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 00:17 IST

दुचाकीवरून कपडे विक्रीच्या बहाण्याने दारूची खरेदी करून आष्टी येथे या दारूची विक्री करणाऱ्यास महागाव खुर्द येथील तंटामुक्त समिती व मुक्तिपथ गाव संघटनेचे सदस्य आणि इतर ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडले. अली अख्तर अंजुमन असे दारूची वाहतूक करून विक्री करणाºयाचे नाव आहे.

ठळक मुद्दे४० लिटर दारू जप्त : महागाव खुर्दजवळ तंटामुक्त समिती व मुक्तिपथची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : दुचाकीवरून कपडे विक्रीच्या बहाण्याने दारूची खरेदी करून आष्टी येथे या दारूची विक्री करणाऱ्यास महागाव खुर्द येथील तंटामुक्त समिती व मुक्तिपथ गाव संघटनेचे सदस्य आणि इतर ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडले.अली अख्तर अंजुमन असे दारूची वाहतूक करून विक्री करणाºयाचे नाव आहे. या इसमाकडून ४० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. महागाव खुर्द नजीक असलेल्या प्राणहिता नदीपात्रात गावातील अनेक जण दारू गाळतात. हा प्रकार थांबण्यासाठी मुक्तिपथ गाव संघटनेद्वारे दारूविक्री बंदीचा ठराव घेण्यात आला आहे. शनिवारी झालेल्या गाव संघटनेच्या सभेत या ठरावाची प्रभावी अंमलबजावणी करण्याविषयी चर्चा करण्यात आली. गावात उघड दारूविक्री होत नसून वेगवेगळ्या मार्गाने ती सुरू आहे. शनिवारी गावात एक इसम दुचाकीवरून कपडे विक्री करीत होता. पण त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. हा इसम गावातून गावठी दारू विकत घेऊन कपड्याच्या पिशवीत लपवून बाहेरगावी विक्रीस नेत असल्याचे लक्षात आले. इसमाने पळ काढताच महागावचे पोलीस पाटील आणि इतरही ग्रामस्थांनी या इसमाचा पाठलाग करून त्याला गाठले. त्याची झडती घेतली असता कपड्याच्या पिशवीत लपविलेल्या गावठी दारूच्या सहा पिशव्या आढळल्या.महागाव येथून दारू विकत घेऊन ती आष्टी शहरात विकत असल्याची कबुली या इसमाने दिली. तात्काळ अहेरी पोलिसांना याची माहिती देण्यात आली. अहेरी पोलिसांनी इसमाजवळील दारू जप्त करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला. गावात येणाºया प्रत्येक विक्रेत्यांवर आता पाळत ठेवणार असल्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. तसेच गावातील अवैध दारू विक्री करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे.जंगलात व नदीलगत अड्डेमोहफूल व गुळापासून दारू गाळण्याकरिता घनदाट जंगल व नदीचे काठ यासारखे सुरक्षित स्थळ निवडले जाते. या ठिकाणीच दारू गाळून गावात अथवा गावाबाहेर दारूची विक्री होत असते. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अशाप्रकारची दारूविक्री सुरू आहे. त्यामुळे पोलिसांनाही अंदाज येत नाही.

टॅग्स :liquor banदारूबंदी