शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

नि:स्वार्थ जनसेवेने खरे समाधान मिळते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2019 11:55 PM

मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी देसाईगंज तालुक्यातील कुकडी येथे नि:शुल्क दमा औषधीचे वितरण केले जाते. अनेकांना याचा लाभ घडत असल्याने दरवर्षी औषधी घेणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे.

ठळक मुद्देप्रल्हाद कावळे यांच्याशी थेट संवाद

अतुल बुराडे ।लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा : मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी देसाईगंज तालुक्यातील कुकडी येथे नि:शुल्क दमा औषधीचे वितरण केले जाते. अनेकांना याचा लाभ घडत असल्याने दरवर्षी औषधी घेणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. याही वर्षी मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी ८ जून रोजी औषधीचे वितरण केले जाणार आहे. यानिमित्त वैदू प्रल्हाद कावळे यांच्याशी थेट संवाद साधून लोकमतने त्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, स्वार्थ न बाळगता केलेल्या जनसेवेमुळे खरे समाधान मिळते, असे मत कावळे यांनी व्यक्त केले.दमा रोगावर औषध देण्याची प्रेरणा कुठून मिळाली?- मला स्वत:ला दमा होता. दमा रोग बरा होण्यासाठी मी धडपड होतो. त्यातूनच दमावरची औषधी शोधून काढली. स्वत:वरच तीन वर्ष सतत प्रयोग केला. त्यातून मी बरा झालो. त्यानंतर गावातील दुसºया व्यक्तीवर प्रयोग केला. तो सुध्दा बरा झाला. त्यातून औषधाविषयची खात्री पटली. त्यानंतर मित्रमंडळी, गावकरी, नातलग यांना दमा औषधीचा लाभ झाला. त्यामुळे दमा औषधी घेणाऱ्यांची संख्या वाढत गेली व आज ती लाखोंच्या घरात पोहोचली आहे.औषधीसाठी कुठून कुठून रूग्ण येतात?- जेव्हा मी दमा औषध देणे सुरू केले. त्यावेळी माझ्या गावातील व आजुबाजुच्या गावचे रूग्ण येऊ लागले. त्यानंतर प्रचार होऊन महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यातील दमा रूग्ण कोकडी येथे येतात.रूग्णसेवेकडे आपण कोणत्या दृष्टीने बघता?- मी पाचवा वर्ग शिकलो आहे. दुसºयांचे चांगले करावे, असे संस्कार माझ्या आई-वडिलांनी केले आहेत. दमा रूग्णांना होणारा त्रास मी स्वत: अनुभवला आहे. समाजातील ज्या रूग्णांना दमा रोग झाला आहे, त्यांना दमा रोगातून कायमचा मुक्त करणे या विचाराने आजही मी दमा औषधीचे वितरण करतो.आपल्या सेवाकार्याला गावकऱ्यांचे योगदान लाभते काय?- रूग्णांची संख्या वाढली आहे. हजारो रूग्णांना केवळ माझ्या घरी औषध देणे शक्य होत नाही. आता रूग्णांची संख्या हजारोंच्या घरात राहत असल्याने बिसन सहारे यांच्या मालकीच्या वाड्यात औषधी दिली जाते. औषधीसाठी लागणाऱ्या मासोळ्या ढिवर-भोई समाज गोळा करतात. रूग्णांच्या राहणे व जेवनाची व्यवस्था गावकरी करतात. त्यामुळे माझ्या या कार्यात गावकऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. पोलीस विभाग संरक्षण उपलब्ध करून देते.

टॅग्स :medicineऔषधं