शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

येल्लातील मोहफुलाचा सडवा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 05:00 IST

अहेरी तालुका नक्षल प्रभावित आहे. त्यामुळे जंगलात जाऊन कारवाई करणे पोलिसांसाठी धोक्याचे राहत असल्याने याचा गैरफायदा उचलत काही नागरिक जंगलातच मोहफुलाचा सडवा बनवतात. त्यानंतर या सडव्यापासून दारू काढली जाते. दारू काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात सरपणाची गरज भासते. सदर सरपण सुद्धा जंगलातून मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. त्यामुळे दारू काढणारे जंगलातच दारू काढत असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देअहेरी पोलिसांची कारवाई : चार आरोपींविरोधात केला गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : अहेरी पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या मुलचेरा तालुक्यातील येल्ला गावालगत असलेल्या झुडूपी जंगलात धाड टाकून सुमारे ४० हजार रुपयांचा मोहफूल सडवा व मुद्देमाल जप्त केला आहे.लॉकडाऊनमुळे देशी व विदेशी दारू मिळणे अशक्य झाले आहे. त्यामुळे दारू पिणारे आता मोहफुलाच्या दारूकडे वळले आहेत. या संधीचा फायदा उचलत अनेकांनी दारू काढण्यास सुरूवात केली आहे. येल्ला येथील जंगलात मोहफुलाची दारू काढली जात असल्याची गोपनीय माहिती अहेरी पोलिसांना प्राप्त झाली. पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस, पोलीस हवालदार काशिनाथ दुबे, मारोती मोदेकर, दुर्गासिंग घाटघुमर यांनी जंगलात धाड टाकून ४० हजार रुपयांचा मोहफूल सडवा व मुद्देमाल जप्त केला आहे.या ठिकाणी मोहफुलाचा सडवा भरलेले पाच ड्रम आढळून आले. याप्रकरणी चार आरोपींवर दारूबंदी व साथरोग प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अहेरी तालुका नक्षल प्रभावित आहे. त्यामुळे जंगलात जाऊन कारवाई करणे पोलिसांसाठी धोक्याचे राहत असल्याने याचा गैरफायदा उचलत काही नागरिक जंगलातच मोहफुलाचा सडवा बनवतात. त्यानंतर या सडव्यापासून दारू काढली जाते. दारू काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात सरपणाची गरज भासते. सदर सरपण सुद्धा जंगलातून मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. त्यामुळे दारू काढणारे जंगलातच दारू काढत असल्याचे दिसून येते.दारूची मागणी वाढलीलॉकडाऊनमुळे अनेक नागरिक घरीच आहेत. तसेच देशी व विदेशी दारू मिळणे जवळपास कठीण झाले आहे. त्यामुळे दारूचे शौकीन आता मोहफुलाच्या दारूकडे वळले आहेत. कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी घराच्या बाहेर न पडण्याचा सल्ला दिला जात असला तरी याचे पालन ग्रामीण भागातील नागरिक करीत नाही.

टॅग्स :liquor banदारूबंदी