शहरं
Join us  
Trending Stories
1
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
2
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
3
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
4
“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”
5
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
6
Corona Virus : कोरोना रिटर्न्स! JN.1 व्हेरिएंटचा कहर; 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, 'या' लोकांना सर्वाधिक धोका
7
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
8
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
9
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
10
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
11
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
12
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
13
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
15
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
16
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
17
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
18
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
19
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
20
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार

सील ठोकलेल्या घरातून जप्त केलेला गूळ गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 23:00 IST

तालुका मुख्यालयापासून ३० किमी अंतरावरील जाफ्राबाद (टेकडाताला) येथील गूळ साठवलेल्या घराला पोलिसांनी सील ठोकली. मात्र या घरातील गूळ अचानक गायब झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देजाफ्राबाद येथील प्रकार : गावकऱ्यांनी पकडला होते गूळ

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तालुका मुख्यालयापासून ३० किमी अंतरावरील जाफ्राबाद (टेकडाताला) येथील गूळ साठवलेल्या घराला पोलिसांनी सील ठोकली. मात्र या घरातील गूळ अचानक गायब झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.जाफ्राबाद येथील स्वयंसहाय्यता महिला बचतगटाने १६ एप्रिल रोजी गडचिरोली येथे भेट घेऊन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व दारूबंदी मुक्तिपथ कार्यालयास लेखी निवेदन दिले. सदर निवेदनात त्यांनी अवैध काळा गूळ व त्यापासून गाळलेल्या दारूपासून होणारे गंभीर दुष्परिणाम निदर्शनास आणून दिले. १९ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता बामणी पोलिसांनी जाफ्राबाद येथील घर क्र. ३०४ ला सिल ठोकले. सदर घर जयहिंद मुत्तय्या अल्लुरी या इसमाचे आहे. सदर घर पडीक होते. या घरात मोठ्या प्रमाणात काळा गूळ साठवून ठेवला होता. घराच्या दोन्ही दारांना पोलिसांनी सिल ठोकले. मात्र काही दिवसातच या घरातील गूळ पूर्णपणे गायब झाला आहे. घर जयहिंद अल्लुरी यांच्या मालकीचे असले तरी त्यातील काळा गूळ हा देवाजी यलय्या दुर्गम या इसमाचा आहे, अशी माहिती गावकºयांनी दिली आहे. देवाजी हा दारू तस्कर आहे. पूर्वी सागवान लाकूड तस्करीच्या गुन्ह्यात वन विभागाने त्याचे वाहन जप्त केले होते, हे विशेष. पोलिसांनी सिल ठोकून ठेवले असतानाही गूळ गायब झाला कसा, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. सिल ठोकल्यावर त्या मालाची देखरेख करण्याची जबाबदारी पोलिसांची राहते. मात्र पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणाबाबत बामणी पोलिसांना विचारणा केली असता, त्यांनी माहिती देण्यास नकार दिला. गूळ गायब होऊनही पोलीस मात्र सदर प्रकरण गंभीरतेने घेत नसल्याचे दिसून येत आहे. एकीकडे गावकरी गावात दारूबंदी करण्यासाठी प्रयत्नरत असतानाच पकडून दिलेले गूळ गायब झाल्याने गावकरी निराश झाले आहेत.१९ एप्रिल रोजीच शंकर व्यंकय्या आशा या इसमाची दारू जप्त केली होती. दारूविक्रेत्याच्या विरोधात कोणती कारवाई केली, हे अजूनही गुलदस्त्यातच आहे.