शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवस शाळा व खासगी आस्थापना राहणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2022 05:00 IST

मागील दाेन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस काेसळत आहे. नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. काही नदी-नाल्यांना पूर आला असून ठेंगण्या पुलांवरून पाणी वाहत आहे. अशा स्थितीत कामानिमित्त निघालेले नागरिक पुलावरून पाणी असताना रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे दुर्घटना घडू शकते. साेमवार ते बुधवारपर्यंत हवामान खात्याने गडचिराेली व चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : हवामान खात्याने १२ जुलैपर्यंत जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून पुढील तीन दिवस म्हणजेच बुधवारपर्यंत जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, खासगी कार्यालये, सर्व प्रकारची दुकाने व इतर व्यवसाय बंद ठेवण्यात येतील. अत्यावश्यक सेवा व शासकीय कार्यालये सुरू राहतील, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय मीना यांनी दिले आहेत. मागील दाेन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस काेसळत आहे. नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. काही नदी-नाल्यांना पूर आला असून ठेंगण्या पुलांवरून पाणी वाहत आहे. अशा स्थितीत कामानिमित्त निघालेले नागरिक पुलावरून पाणी असताना रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे दुर्घटना घडू शकते. साेमवार ते बुधवारपर्यंत हवामान खात्याने गडचिराेली व चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे परिस्थती आणखी बिघडू शकते. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी तीन दिवस बंद ठेवण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. 

३५३ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले-   नदीच्या काठी व सखल भागात वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना प्रशासनाने सुरक्षितस्थळी हलविले आहे. या कुटुंबांची व्यवस्था प्रामुख्याने जिल्हा परिषद शाळांमध्ये केली आहे. -    अहेरी तालुक्यातील सूर्यापल्ली येथील १६, गाेलाकर्जी ४०, तिमरम ४, माेदुमगडगू ४, निमलगुडम १२, रेगुलवाही १५, मरमपल्ली ४०, लिंगमपल्ली १२०, कमलापूर ३१, छल्लेवाडा ७१ जणांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. तसेच  सिराेंचा तालुक्यातील मद्दीकुंठा ३२ व सूर्यारावपल्ली येथील ४० नागरिक असे एकूण ३५३ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे.

१५ दिवसात पाच जणांचा पुरामुळे बळी आरमाेरी तालुक्यातील देलाेडा येथील राजकुमार एकनाथ राउत हा ४ जुलै राेजी काेलांडी नाल्यावर मासे पकडण्यासाठी गेला असता ताे वाहून गेला. अहेरी तालुक्यातील पेरमिली नाल्यावर जितेंद्र दाेडके हा वीज कर्मचारी ९ जुलै राेजी वाहून गेला. १० जुलैच्या रात्री याच पेरमिली नाल्यावर एक ट्रक वाहून गेला. या ट्रकमध्ये अहेरी तालुक्यातील कासमपल्ली येथील सीताराम बिच्छु तलांडे, सम्मी सीताराम तलांडे, भामरागड तालुक्यातील माेकाेला येथील पुष्पा नामदेव गावडे ही १४ वर्षाच्या मुलीचे मृतदेह आढळले.

भारतीय हवामान विभागाच्या सूचनेनुसार साेमवार ते बुधवारपर्यंत वज्राघात, अतिवृष्टी हाेण्याची शक्यता आहे. नदी नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असताना नागरिकांनी काेणत्याही परिस्थितीत पूल ओलांडू नये. नदी नाल्याजवळ सेल्फी काढू नये. खबरदारीचा उपाय म्हणून पुढील तीन दिवस शाळा, महाविद्यालये, खासगी आस्थापना, दुकाने बंद ठेवावीत. अत्यावश्यक सेवा व शासकीय कार्यालये सुरू राहतील. प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने मुख्यालयी राहणे सक्तीचे आहे. - संजय मीना, जिल्हाधिकारी, गडचिराेली

प्रशासन अलर्टपुढील तीन दिवस अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेउन प्रशासन अलर्ट झाले आहे. मुख्यालयी राहण्याच्या सूचना सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. ज्या पुलावरून पाणी वाहत आहे अशा ठिकाणी दाेन्ही बाजुला पाेलीस तैनात केले जातील.

या धरणांचे पाणी साेडले वैनगंगा नदीचे मध्यप्रदेशातील संजय सराेवराचे सर्वच १० दरवाजे उघडण्यात आले आहेत. गाेसेखुर्द धरणाचे ३३ पैकी ५ दरवाजे, चिचडाेह बॅरेजचे ३८ दरवाजे उघडले आहेत.वर्धा नदीवरील उर्ध्व वर्धा प्रकल्पाचे सर्वच १३ दरवाजे उघडले आहेत. निम्म वर्धा प्रकल्पाचे ३१ पैकी ७ दरवाजे उघडले आहेत.गाेदावरील नदीवरील मेडीगड्डा बॅरेजचे ८५ पैकी ६५ दरवाजे  उघडले  आहेत.भामरागड तालुक्यातील इंद्रावती, पर्लकाेटा, पामुलगाैतम या नद्यासुद्धा ओसांडून वाहत आहेत.

 

टॅग्स :Rainपाऊसcollectorजिल्हाधिकारी