गडचिराेली : काेराेना महामारीच्या संकटामुळे प्राथमिक वर्गाच्या शाळा अद्यापही सुरू झाल्या नाहीत. त्यातच मैदानी खेळही बंद आहेत. यामुळे मागील आठ ते दहा महिन्यांपासून शाळकरी मुले-मुली घरातच बंदिस्त आहेत. दुसरीकडे ऑनलाइन क्लासेससाठी स्मार्टफाेन किंवा संगणक अत्यावश्यक असून विरंगुळा म्हणून टीव्ही पाहणे सुरू आहे. साहजिकच शारीरिक हालचाल कमी झाल्याने काही मुलांच्या व काही मुलींच्या वजनात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
काेराेनामुळे गेल्या वर्षभरापासून शैक्षणिक सत्र सुरू झाले नाही. रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर नववी ते बारावी आणि त्यानंतर पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्यात आल्या. मात्र, फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा काेराेनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याने मुले पुन्हा घरात बंदिस्त झाली.
बाॅक्स .....
मुलांनी हे करावे !
सकाळी लवकर उठावे तसेच रात्री लवकर झाेपावे. शारीरिक हालचाल करण्यासाठी घरासमाेरील माेकळ्या जागेत अथवा रस्त्यांवर किमान धावण्याचा सराव करावा. मैदानी खेळ खेळावेत, जेवनाची वेळ निश्चित करावी. काेराेनामुळे शाळा बंद आहेत. चाैथीपर्यंतच्या मुलांना घरीच राहावे लागत असल्याने त्यांनी दिवसभराचे वेळापत्रक ठरवून घ्यावे. चटपटीत पदार्थ खाणे टाळावे.
बाॅक्स .....
मुलांनी हे टाळावे !
स्मार्टफाेन, संगणक आणि टीव्हीचा अनावश्यक वापर टाळावा. यामुळे अधिक वेळ बसण्याची गरज भासणार नाही. जंक फूडचे सेवन पूर्णत: टाळायला पाहिजे. जास्तीत जास्त सात तास झाेप घ्यावी. खूप वेळ एकाच ठिकाणी बसून न राहता. घरातल्या घरात अथवा मैदानावर खेळावे. सतत शारीरिक हालचाल करावी, छाेटा व हलकासा व्यायाम करावा. जेणेकरून वजन वाढणार नाही.
काेट ........
सकाळी उठणे, शाळेत जाणे, दुपारी शाळेतून घरी परतल्यानंतर जेवण, सायंकाळी मैदानात खेळणे, थकवा आल्यानंतर रात्री लवकर झाेपणे, असा दिनक्रम पूर्वी शाळकरी मुला-मुलींचा हाेता. लाॅकडाऊनमुळे मुलांच्या वेळापत्रकात अनियमितता आली आहे. मुले दिवसभर घरीच राहत असल्याने त्यांची झाेपण्याची व जेवणाची वेळ निश्चित राहिली नाही. त्यामुळे त्यांचे वजन वाढत आहे.
- डाॅ. प्रशांत चलाख, बालराेगतज्ज्ञ, गडचिराेली
काेट .....
ऑनलाइन शिक्षणामुळे मुले स्मार्टफाेन व टीव्हीसमाेरच अधिक वेळ असत आहेत. माेकळे खेळण्याची त्यांना मुभा नसल्याने त्यांच्यामध्ये चिडचिडेपणा वाढत असल्याचे दिसून येते. वयाेमानानुसार मुलांचे वजन वाढायला हवे. मात्र, शारीरिक हालचाल कमी झाल्याने त्यांच्या वजनात वाढ हाेत आहे. पालकांनी मैदानी खेळ व व्यायामाकडे मुला-मुलींना वळविले पाहिजे.
- डाॅ. श्रावंती काेल्लुरी, वैद्यकीय अधिकारी, गडचिराेली