लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : लग्न समारंभ आटोपून वऱ्हाडी घेऊन जाणाऱ्या स्कूलबस चालकाचे नियंत्रण सुटल्याने स्कूलबस नाल्यात कोसळून झालेल्या अपघातात काही वऱ्हाडी किरकोळ जखमी झाल्याची घटना शुक्रवारी २० एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास चामोर्शी तालुक्यातील भिवापूरजवळील नाल्यावर घडली.प्राप्त माहितीनुसार एमएच ३३ - १०४८ क्रमांकाची स्कूलबस लग्नसमारंभ आटोपून लग्नातील वऱ्हाडी घेवून सायंकाळी परत जात होती. दरम्यान तालुक्यातील भिवापूर जवळील नाल्यावर स्कूलबस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने स्कूलबस पुलावरून थेट पुलाखाली कोसळली. यामध्ये काही वऱ्हाडी किरकोळ जखमी झाले. सदर बस माऊंट हॉयर सेकंडरी स्कूल बामणी (बल्लारपूर) येथील असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सध्या लग्न हंगाम जोमात सुरू असल्याने वºहाड्यांची विविध वाहनातून वाहतूक सर्वत्र होत आहे. लग्न वऱ्हाड्यांच्या वाहनाला अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.
वऱ्हाडी नेणारी स्कूलबस नाल्यात कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 01:15 IST
लग्न समारंभ आटोपून वऱ्हाडी घेऊन जाणाऱ्या स्कूलबस चालकाचे नियंत्रण सुटल्याने स्कूलबस नाल्यात कोसळून झालेल्या अपघातात काही वऱ्हाडी किरकोळ जखमी झाल्याची घटना शुक्रवारी २० एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास चामोर्शी तालुक्यातील भिवापूरजवळील नाल्यावर घडली.
वऱ्हाडी नेणारी स्कूलबस नाल्यात कोसळली
ठळक मुद्देजीवितहानी नाही : भिवापूरनजीकची घटना