शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

बीजे अभ्यासक्रमाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती हडपली

By admin | Updated: February 7, 2015 23:23 IST

चंद्रपूर येथील एलआरटी भोसले कॉलेज आॅफ मॅनेजमेंट या महाविद्यालयात सत्र २०१२-१३ मध्ये बीजे या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील दोन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

गडचिरोली : चंद्रपूर येथील एलआरटी भोसले कॉलेज आॅफ मॅनेजमेंट या महाविद्यालयात सत्र २०१२-१३ मध्ये बीजे या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील दोन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यातच आली नाही, असा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या सहायक समाज कल्याण आयुक्त पदाचा भार वाहणाऱ्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही त्यांनी कुठलीही चौकशी केली नाही. असा आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे. २०१२-१३ या शैक्षणिक वर्षात गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील रहिवासी असलेला मंगेश बंडुजी भांडेकर व अन्य एक अशा दोन विद्यार्थ्यांनी चंद्रपूर येथील एलआरटी भोसले कॉलेज आॅफ मॅनेजमेंट या संस्थेत बीजे अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. दोन्ही विद्यार्थी हे शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांचे अर्ज शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. या विद्यार्थ्याला प्रत्येकी ७ हजार रूपये शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली. मात्र संस्थेकडून या दोघांनाही शिष्यवृत्तीची रक्कम अदा करण्यात आली नाही. त्यानंतर भांडेकर याने संस्थेकडे चौकशी केली. त्यावेळी संस्थेतून समाज कल्याण विभागाकडे चौकशी करा, असे सांगण्यात आले. त्यानंतर चंद्रपूर येथील समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त टी. डी. बरगे यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार देण्यात आली. ते गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याचा पदभार सांभाळून होते. मात्र त्यांनी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नसतानाही तक्रारीची दखल अद्यापही घेतलेली नाही. हे दोनही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)