शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचा हायव्हॉल्टेज ड्रामा; "मला टॉर्चर केले गेले, अन्..."
2
महापुरुषांचा अपमान करणाऱ्या नेत्यांची यादीच वाचली; जितेंद्र आव्हाडांनी भाजपाला सुनावलं
3
"कंगनाकडे राणी लक्ष्मीबाईसारखे शौर्य आणि...", योगी आदित्यनाथांनी उधळली स्तुतीसुमने
4
"महात्मा गांधींबाबत माहित नाही, मग त्यांना राज्यघटनेबाबतही…’’, मल्लिकार्जुन खर्गेंचा नरेंद्र मोदींवर संताप
5
"हा उद्योग केल्यावर दोन दिवस झोप लागली नाही"; रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरने दिली कबुली
6
सरकार स्थापन होताच 25 दिवस खास तरुणांसाठी! अखेरच्या रॅलीत काय-काय बोलले पंतप्रधान मोदी?
7
महाराष्ट्रात निकाल काय? Lokniti-CSDS च्या विश्लेषकांची भविष्यवाणी; महायुतीला धक्का
8
"नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवली...", मनमोहन सिंग यांची पत्रातून टीका
9
दोन मुलांच्या मृत्यूची जबाबदारी ड्रायव्हरच घेईल; ब्रिजभूषण यांची उडवाउडवीची उत्तरे
10
जम्मूमध्ये पोलीस ठाण्यावर हल्ला; लष्कराच्या १६ जवानांवर गुन्हा दाखल
11
आरोग्य सांभाळा! 'या' लोकांसाठी AC ठरू शकतो घातक; फुफ्फुसांचं होईल मोठं नुकसान
12
आमचे येथे श्रीकृपेकरून... अनंत अंबानींचं शुभमंगल 'आमची मुंबई'तच; 'असा' आहे तीन दिवसांचा सोहळा 
13
"देशात इंडिया आघाडीची त्सुनामी, वाराणसीत नरेंद्र मोदी पराभूत होणार’’ मोदींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस नेत्याचा दावा
14
"जितेंद्र आव्हाड मनोविकृत, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा", मंत्री गुलाबराव पाटलांची मागणी
15
OYO ला आर्थिक वर्ष २४ मध्ये १०० कोटींचा निव्वळ नफा; पहिल्यांदाच नफ्यात आली कंपनी
16
"होय, मी संन्यास घ्यायला तयार"; अजित पवारांची अट अंजली दमानियांकडून मान्य, पण...
17
“PM मोदींनी महात्मा गांधींबाबत केलेले विधान म्हणजे देशाचे दुर्दैव”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका
18
अरे देवा! नवऱ्याने रील बनवण्यास केली मनाई; नाराज झालेली बायको मुलीसह झाली फरार
19
Gautam Gambhir च्या विरोधात 'दादा'? गांगुलीचा BCCI ला सल्ला अन् चाहते बुचकळ्यात!
20
TATA चा 'हा' शेअर विकून बाहेर पडतायत गुंतवणूकदार; एक्सपर्ट म्हणाले, "१३५ पर्यंत येणार..."

अनुसूचित जमाती कल्याण समिती उद्या गडचिरोलीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 1:29 AM

आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी जिल्ह्यात राबविल्या जात असलेल्या विविध योजनांची तपासणी करण्यासाठी विधिमंडळाची अनुसूचित जमाती कल्याण समिती तीन दिवसांच्या गडचिरोली दौऱ्यावर येत आहे.

ठळक मुद्देतीन दिवस दौरा : १५ आमदारांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी जिल्ह्यात राबविल्या जात असलेल्या विविध योजनांची तपासणी करण्यासाठी विधिमंडळाची अनुसूचित जमाती कल्याण समिती तीन दिवसांच्या गडचिरोली दौऱ्यावर येत आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा जोमाने तयारीला लागली आहे. काही सदस्य गुरूवारी तर काही शुक्रवारी गडचिरोलीत दाखल होत आहेत.आ.डॉ.अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत एकूण १५ आमदार आणि पाच अधिकारी राहणआर आहेत. १५ आमदारांपैकी ११ विधानसभेचे तर ४ विधान परिषदेचे सदस्य आहेत. विधानसभा सदस्यांमध्ये डॉ.उईके यांच्याशिवाय प्रभुदास भेलावेकर, पास्कल धनारे, संजय पुराम, डॉ.पंकज भोयर, राजाभाऊ वाजे, शांताराम मोरे, अमित घोडा, गोपीकिसन बाजोरिया, वैभव पिचड व पांडुरंग वरोरा तर विधान परिषद सदस्यांमध्ये आनंद ठाकूर, डॉ.संतोष टारफे, चंद्रकांत रघुवंशी, श्रीकांत देशपांडे आदींचा समावेश आहे.प्रत्येक सदस्यांची खास बडदास्त ठेवण्यासाठी एकेका अधिकाऱ्यांकडे जबाबदारी देण्यात आली आहे. हे सदस्य तीन दिवसात जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन शासनाच्या योजनांची अंमलबजावणी किती प्रमाणात झाली याची तपासणी करतील. त्यामुळे आदिवासी आश्रमशाळांपासून विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी या समितीच्या तावडीत सापडणार नाही याची दक्षता घेताना दिसत आहे. या समितीला एखाद्या कर्मचाऱ्यांला जागेवरच निलंबित करण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे कामचुकार कर्मचाºयांचे धाबे दणाणले आहेत.जिल्ह्यात काही ठिकाणी भेटी दिल्यानंतर नोंदविलेल्या निरीक्षणांच्या आधारे ही समिती जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेईल.