शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
3
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
4
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
5
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
6
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
7
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
8
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
9
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
10
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
11
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
12
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
13
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
14
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
15
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
16
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
17
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
18
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
19
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
20
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...

धान खरेदी केंद्रांवर बारदाण्याचा तुटवडा

By admin | Updated: December 7, 2014 22:51 IST

तालुक्यात काही ठिकाणी विविध कार्यकारी संस्थांच्या माध्यमातून धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. मात्र या केंद्रांवर बारदाण्याचा तुटवडा असल्याने धान खरेदी संस्थांसह शेतकऱ्यांसमोर फार

कोरची : तालुक्यात काही ठिकाणी विविध कार्यकारी संस्थांच्या माध्यमातून धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. मात्र या केंद्रांवर बारदाण्याचा तुटवडा असल्याने धान खरेदी संस्थांसह शेतकऱ्यांसमोर फार मोठी अडचण निर्माण झाली आहे. शासनाने धान खरेदी केंद्रांसमोर यावर्षी जाचक अटी लादल्याने जिल्ह्यातील विविध कार्यकारी संस्थांनी धान खरेदी केंद्र सुरू करण्यास बरेच दिवस टोलवाटोलवी केली. त्यानंतर मात्र धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी जवळपास एक महिना उशीराने धान खरेदी केंद्र सुरू झाले आहेत. धान खरेदी केंद्र सुरू झाले असले तरी या केंद्रांवर आदिवासी विकास महामंडळाने बारदाना उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले धान कुठे ठेवावे, असा प्रश्न धान खरेदी केंद्रांच्या व्यवस्थापणासमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे काही धान खरेदी केंद्रांनी धान खरेदी बंद केली आहे. बारदाना उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले धान उघड्यावर ठेवण्यात येईल व यामध्ये काही नुकसान झाल्यास शेतकऱ्याचीच रक्कम कपात करण्यात येईल, असे धोरण धान खरेदी केंद्राच्या व्यवस्थापनाने सुरू केले आहे. त्यामुळे शेतकरीसुध्दा धान विक्री करण्यास धजावत नसल्याचे दिसून येत आहे. नाईलाजास्तव शेतकऱ्यांनी धान घरीच भरून ठेवले आहे. सुरू झालेल्या धान खरेदी केंद्रावर ही नवीनच अडचण निर्माण झाली आहे. धान खरेदी केंद्र व्यवस्थापणाने आदिवासी विकास महामंडळाकडे बारदाना उपलब्ध करून देण्याची मागणी यापूर्वीच केली आहे. प्रत्येक धान खरेदी केंद्राला दर दिवशी शेकडो बारदाना लागतो. कोरची तालुक्यातील कोटगूल व कोटरा या ठिकाणी अजुनही धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे या परिसरातील शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना धान विकत आहेत. सदर केंद्र तत्काळ सुरू करावे, त्याचबरोबर एकरी १० क्विंटल धान खरेदी करण्याची असलेली अट वाढवून १५ क्विंटल करण्यात यावी, अशी मागणी तालुका काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्यामलाल मडावी यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. (तालुका प्रतिनिधी)