शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

वीज दुरुस्तीच्या नावाखाली पावणेतेरा लाखांचा घोटाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 16:54 IST

नऊ अधिकाऱ्यांवर कारवाई : एजन्सी मात्र मोकळ्याच

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नावाखाली वीज दुरुस्तीच्या महावितरणमधील अधिकाऱ्यांनी कंत्राटदार कंपन्यांना हाताशी धरून तब्बल पावणेतेरा लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याची बाब माहिती अधिकाराद्वारे मागविलेल्या तपशिलातून उघड झाली. या प्रकरणात तब्बल नऊ अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई सुरू असल्याचा खुलासा महावितरणने केला आहे. मात्र, कंत्राटदार एजन्सी मोकळ्याच असल्याने ही कारवाई संशयास्पद असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.

महावितरणच्या गडचिरोली मंडळअंतर्गत असलेल्या चामोर्शी, आलापल्ली, एटापल्ली, गडचिरोली, सिरोंचा, तसेच चंद्रपूरमधील ब्रम्हपुरी उपविभागांमध्ये विविध योजनांमध्ये दुरुस्ती, तसेच नवीन वीज जोडणी कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याची तक्रार २६ डिसेंबर २०२३ रोजी प्रादेशिक संचालकांकडे करण्यात आली होती. महात्मा फुले समता परिषदेचे चामोर्शी येथील अध्यक्ष राजेश्वर बुरांडे, राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघाचे मनोहर चलाख, समता परिषदेचे सचिव अरुण दुधबावरे, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष महनोर शेट्टे, ज्येष्ठ नागरिक रवींद्रसिंह चव्हाण यांनी केलेल्या या तक्रारीनंतर त्यांना कुठलीही माहिती दिली नाही. 

चौकशी अहवालात काय ?चंद्रपूर परिमंडळाचे व्यवस्थापक एस. यू. जीवने, बल्लारशाहचे उपकार्यकारी अभियंता एस. एस. कापसे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता के. पी. चांभारे यांच्या त्रिसदस्यीय समितीने चौकशी केली. ११ पानी अहवालात १२ लाख ७८ हजारी ३२४ रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यामध्ये कंत्राटदार एजन्सीने दाखविलेले साहित्य प्रत्यक्ष चौकशीत गायब असल्याचे निदर्शनास आले. तक्रारदार राजेश्वर बुरांडे यांनी मार्च २०२५ मध्ये माहिती अधिकार अर्ज केला. त्यानंतर महावितरणने दिलेल्या माहितीमध्ये नऊ अधिकाऱ्यांवर कारवाई सुरू असल्याची माहिती दिली आहे.

आता वसुलीचे काय ?

  • या प्रकरणात महावितरणने चौकशीसाठी तत्परता दाखविली नाही. त्यामुळे पुरावे नष्ट करण्यास वाव मिळाला. शिवाय पावणे तेरा लाखांचा गैरव्यवहार झाल्याचे मान्य केले, पण या पैशांची वसुली कोणाकडून करणार, याबाबत स्पष्ट उल्लेख नाही.
  • अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई सुरू असल्याचे स्पष्टीकरण दिले गेले, पण त्यांची नावे उघड केली नाही. शिवाय साहित्य पुरवठा व दुरुस्ती कामे करणाऱ्या एजन्सीजना मात्र मोकळे सोडण्यात आले, असे तक्रारदार राजेश्वर बुरांडे यांनी सांगितले. यातून घोटाळेबाजांची पाठराखण केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. 
टॅग्स :Gadchiroliगडचिरोली