ऑनलाईन लोकमतदेसाईगंज : वातावरणातील बदल, भाजीपाला व अन्नधान्यात होणारा रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर व अनेकांना जडलेले मादक पदार्थांचे व्यसन याचा जीवनशैलीवर विपरीत परिणाम होतो. यातून सावरण्यासाठी आरोग्याची काळजी घेणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आ. कृष्णा गजबे यांनी केले.देसाईगंज तालुक्यातील कुरुड येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आयोजित रोगनिदान शिबिराचे उद्घाटन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. सदस्य रोशनी पारधी होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जि. प. कृषी सभापती नाना नाकाडे, पं. स. सभापती मोहन गायकवाड, उपसभापती गोपाल उईके, पं. स. सदस्य अर्चना ढोरे, शेवंता अवसरे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिगांबर मेश्राम, सरपंच मारोती मडावी, रूग्ण कल्याण समितीचे सदस्य किशोर मेश्राम, व्यसनमुक्ती तालुका संघटिका भारती उपाध्ये, विलास गोटेफोडे, माजी तंमुस अध्यक्ष हरी ढोरे उपस्थित होते.मार्गदर्शन करताना आ. गजबे पुढे म्हणाले, धकाधकीच्या या काळात मानवाच्या शरीरावर विपरीत परिणाम होत असून प्रत्येक आजारावर औषधोपचार शक्य असला तरी त्याचे वेळेत निदान होणे गरजेचे आहे. अनेकांना क्षयरोग, कर्करोग, कुष्ठरोग, गुप्तरोग यासारखे आजार जडतात. मात्र आपली बदनामी होऊ नये म्हणून आजारावर उपचार घेण्याऐवजी आजार दडवून ठेवला जातो. परिणामी अनेकांना अकाली मृत्यू येते. यातून सावरण्यासाठी शासकीय स्तरावरुन विविध योजनेंतर्गत रोग निदान व उपचार करण्यात येत असून याचा गरजूंनी लाभ घेऊन होणारी हानी टाळावी, असेही ते म्हणाले.आरोग्य शिबीरात एकूण ४१२ लोकांची आरोग्य तपासणी करून उपलब्ध सुविधेनुसार औषधोपचार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन डॉ. पी. जी. सडमेक, प्रास्ताविक डॉ. अशोक गहाणे तर आभार गरफळे यांनी मानले. स्त्रीरोगतज्ञ डॉ. प्रशांत झोडे, डॉ. झोडे, बालरोगतज्ञ अनिल नाकाडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक कुमरे, डॉ. स्नेहल बांदरे, डॉ. यशश्री लिमजे यांनी शिबिरात आरोग्य तपासणी केली.
व्यसनातून स्वत:ला सावरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 00:47 IST
वातावरणातील बदल, भाजीपाला व अन्नधान्यात होणारा रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर व अनेकांना जडलेले मादक पदार्थांचे व्यसन याचा जीवनशैलीवर विपरीत परिणाम होतो.
व्यसनातून स्वत:ला सावरा
ठळक मुद्देआमदारांचे प्रतिपादन : कुरूड येथील शिबिरात ४१२ लोकांची आरोग्य तपासणी