आॅनलाईन लोकमतगडचिरोली: स्त्री शिक्षणाचा पाया घातलेल्या सावित्रीबाई फुले यांना अपेक्षित असलेली शैक्षणिक क्रांती व त्यातून स्वत:चा विकास साधणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातल्या मार्कंडादेव येथील आदिवासी स्त्रियांनी सावित्रीबाईंना आपली आदरांजली व्यक्त केली.संत सखुबाई महिला बचत गट,प्रगती महिला बचत गट, प्रेरणा महिला बचत गटाच्या संयुक्त विद्यमाने येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी झाली.या बचतगटांच्या सहकार्याने गावातील आदिवासी स्त्रियांनी उदबत्ती उद्योग, खाणावळ, स्वस्त धान्य दुकान अशा अनेक क्षेत्रात आपले पाय रोवले आहेत. यावेळी ग्राम पंचायत सदस्य अश्विनी परचाके, कीर्ती आत्राम, सुनिता मरस्कोल्हे, जुमनाके, कोडापे, मडावी, कुळसंगे, आत्राम आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी गीत गायन व वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आधुनिक स्त्रीसमोरील आव्हाने या विषयावर गावातील स्त्रिया व महाविद्यालयीन मुलींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्र माचे संचालन मरस्कोल्हे तर आभार सुरपाम यांनी मानले.
सावित्रीबाई फुले यांना अपेक्षित असलेली क्रांती साधत आहेत गडचिरोलीतील आदिवासी स्त्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 13:02 IST
स्त्री शिक्षणाचा पाया घातलेल्या सावित्रीबाई फुले यांना अपेक्षित असलेली शैक्षणिक क्रांती व त्यातून स्वत:चा विकास साधणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातल्या मार्कंडादेव येथील आदिवासी स्त्रियांनी सावित्रीबाईंना आपली आदरांजली व्यक्त केली.
सावित्रीबाई फुले यांना अपेक्षित असलेली क्रांती साधत आहेत गडचिरोलीतील आदिवासी स्त्रिया
ठळक मुद्देबचतगटांच्या माध्यमातून स्त्री विकासाची वाटचाल