लघुपटाच्या प्रकाशनप्रसंगी प्रकल्प अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, लघुपटाचे लेखक-निर्माते-दिग्दर्शक गणेश बैरवार, छायाचित्रकार बाळू मने उपस्थित होते. या लघुपटाबरोबर कोरोनावर आधारित दुसऱ्या लघुपटाचेही प्रकाशन करण्यात आले. हे दोन्ही लघुपट कोरोना जनजागृतीशी निगडित असून, या माध्यमातून लोकांमध्ये जागृती केली जाणार आहे. विशेष म्हणजे, या लघुपटांची निर्मिती करताना त्यांनी स्थानिक भाषेचा वापर करून स्थानिक कलाकारांचा वापर केला आहे.
या लघुपटात नागसेन गोडसे, मुकुल खेवले, ज्योती खेवले, सपना ठवकर, प्रेमिला निखारे, श्रुती रामटेके, नेहा रामटेके, श्वेता रामटेके, सूरज वनस्कर, सुनील राऊत, आदी कलाकार आहेत. संपूर्ण छायाचित्रण आरमोरी येथे करण्यात आले आहे. काेराेनाबाबत लोकांमधील असलेले गैरसमज व अफवा दूर करण्यासाठी लघुपट तयार केला आहे. लसीकरणाबाबत ग्रामीण भागात ४५ वर्षांवरील अनेक नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. तसेच काही लाेकांकडून अफवा पसरवली जात असल्याने ग्रामीण भागातील नागरिक लसीकरणासाठी घाबरत आहेत. नागरिकांमध्ये असलेली भीती दूर करण्यासाठी ‘सेव्ह लाईफ’ या लघुपटाद्वारे जनजागृती केली जाणार आहे, असे गणेश बैरवार यांनी सांगितले.
===Photopath===
260521\26gad_2_26052021_30.jpg
===Caption===
‘सेव लाईफ’लघुपटाचे प्रकाशन करताना जिल्हासधिकारी दीपक सिंगला.