शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचांना ओळखपत्र मिळण्यास विलंब

By admin | Updated: April 17, 2017 01:39 IST

सरपंचांना विविध कामांसाठी अनेक प्रशासकीय विभागांकडे जावे लागते. त्यांची स्वत:ची ओळख व्हावी,

बीडीओ यांना निवेदन : महिला राजसत्ता आंदोलनतर्फे आंदोलनाचा इशारा गडचिरोली : सरपंचांना विविध कामांसाठी अनेक प्रशासकीय विभागांकडे जावे लागते. त्यांची स्वत:ची ओळख व्हावी, यासाठी सरपंचांना ओळखपत्र देण्यात यावे, अशी मागणी महिला राजसत्ता आंदोलनातर्फे संवर्ग विकास अधिकारी यांच्या मार्फतीने शासनाकडे पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संरचनेमधील ग्राम पंचायत हा शेवटचा घटक असला तरी अत्यंत महत्त्वाचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाले आहे. ग्राम पंचायतीमध्ये महिलावर्ग सरपंच पद सांभाळत आहेत. सरपंचाची जबाबदारी स्वीकारलेल्या महिलांना विविध शासकीय कामांसाठी शासनाच्या विविध विभागांकडे जावे लागते. सरपंचाची ओळख पटविण्यासाठी त्याच्याकडे ओळखपत्र देण्याबाबतचा आदेश शासनाने १७ फेब्रुवारी २०१४ रोजी काढला आहे. अधिकाऱ्यांच्या निष्क्रीयतेमुळे सरपंचांना ओळखपत्रांचे वेळेवर वाटप होत नसल्याचे दिसून येत आहे. ओळखपत्र देण्यात यावे, अन्यथा पंचायतराज दिनाच्या दिवशी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. राज्यातील महिला सरपंचांनी २०१५ च्या हिवाळी अधिवेशनात धरणे आंदोलन केले होते. याच प्रश्नासाठी ग्रामविकास विभागाचे मुख्य सचिव, राज्याचे अर्थमंत्री, ग्रामविकास मंत्री, पंचायतराज समितीच्या राज्य महिला आयोग यांना भेटून निवेदन दिल्यानंतर सर्व पंचायत समित्यांना ओळखपत्र देण्याबाबत कळविले होते. त्यानुसार काही पंचायत समित्यांनी ओळखपत्राचे वितरण केले आहे. मात्र काही पंचायत समित्या याकडे दुर्लक्ष केले आहे. महिलाराज सत्ता आंदोलनाच्या वतीने गडचिरोली, आरमोरी, धानोरा या पंचायत समितीच्या संवर्ग विकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन ओळखपत्र देण्याबाबतची मागणी केली आहे. ओळखपत्र न दिल्यास २४ एप्रिल रोजी होणाऱ्या पंचायतराज दिनाच्या दिवशी आंदोलनाचा इशारा गडचिरोली जिल्हा संघटीका ज्योती मेश्राम, आरमोरी तालुका संघटीका अर्चना जनगनवार, गडचिरोली तालुका संघटीका ममता शिवणकर, धानोरा तालुका संघटीका मनीषा मडावी, गुरूदास सेमस्कर, मंजूषा दोनाडकर यांनी दिला आहे. (नगर प्रतिनिधी)