लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्वत:च्या जगण्यातूून इतरांना मोठे करण्याची प्रेरणा देते व जगण्यासाठी आधार देतो तो जगातील सर्वात सर्वात प्रामाणिक व्यक्ती आहे. राष्टÑसंत तुकडोजी महाराज यांचे विचार समाजाला योग्य दिशा दाखविणाºया दीपस्तंभासारखे आहे, असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांनी केले.राष्टÑसंत विचार साहित्य परिषद चंद्रपूर व अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळ मुख्य शाखा गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने राष्टÑसंत साहित्य विचार कृती संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या साहित्य संमेलनाचा समारोप शनिवारी करण्यात आला. समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. हरिश्चंद्र बोरकर होते. स्वागताध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे, पंचायत समिती उपसभापती विलास दशमुखे, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, अॅड. राजेंद्र जेनेकर, विलास उगे, माजी खा. मारोतराव कोवासे, उत्तम गेडाम आदी मान्यवर उपस्थित होते.स्वागताध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे यांनी साहित्य संमेलनाच्या यशस्वितेसाठी आयोजन समितीचे कौतूक केले. बंडोपंत बोढेकर यांनी राष्टÑसंतांच्या साहित्याचे महत्त्व सांगताना म्हणाले, राष्ट्रसंतांच्या विचाराने प्रबुद्ध समाज निर्माण व्हावा आणि राष्टÑोन्नतीच्या कार्यात उपयोगी पडावा असा आशावाद व्यक्त केला. संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणाºया संजय वैद्य, विलास उगे, डॉ. जयस्वाल, सतिश लोंढे, अॅड. जेनेकर, अरविंद वासेकर, संदीप कुटकुरवार, प्रा. संदीप जोशी, शंकर दरेकर आदींचा सत्कार करण्यात आला.संचालन अॅड. सारिका जेनेकर तर आभार पंडित पुडके यांनी मानले. सकाळच्या परिसंवादात ‘राष्टÑसंतांच्या साहित्याचा माझ्यावरील प्रभाव’ यावर राज घुमनर, रूपंचद दखने, उत्तम पानघाटे, मारोती साव, माणिक बेलुरकर, शामराव मोहूर्ले, सयाम, प्रेमलाल पारधी, यांनी विचार मांडले. संमेलनात तेलंगना, नांदेड, अकोला, यवतमाळ या जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते.
राष्टÑसंत तुकडोजी महाराजांचे साहित्य जागतिक दीपस्तंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 01:40 IST
स्वत:च्या जगण्यातूून इतरांना मोठे करण्याची प्रेरणा देते व जगण्यासाठी आधार देतो तो जगातील सर्वात सर्वात प्रामाणिक व्यक्ती आहे.
राष्टÑसंत तुकडोजी महाराजांचे साहित्य जागतिक दीपस्तंभ
ठळक मुद्देप्रंचित पोरेड्डीवार यांचे प्रतिपादन : संमेलनाचा समारोप