शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

रक्ताचे दातृत्व जपणारे संत निरंकारी मंडळ

By admin | Updated: June 14, 2015 01:54 IST

‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे’, असे म्हणतात. हे १०० टक्के सत्यात उतरविण्याचे काम गडचिरोली जिल्ह्यातील निरंकारी मंडळाने केले आहे.

दरवर्षी ५५० बॅग रक्त : १९८४ पासून उपक्रमदिगांबर जवादे गडचिरोली‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे’, असे म्हणतात. हे १०० टक्के सत्यात उतरविण्याचे काम गडचिरोली जिल्ह्यातील निरंकारी मंडळाने केले आहे. १९८४ पासून संत निरंकारी मंडळ दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन मोठ्या प्रमाणावर करीत आहे. प्रत्येक वर्षी रक्तदान शिबिरातून जवळपास ५५० बॅग रक्त जिल्हा रूग्णालयाला पुरविण्याचे काम संत निरंकारी मंडळाने अखंडीतपणे सुरू ठेवले आहे. आधुनिक युगात मंदिर व धार्मिक ठिकाणांबाबत दातृत्व जपणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते. अनेक मंदिराच्या तिजोऱ्या पैशाच्या ढिगाने भरून गेल्याचे आपण वेळोवेळी वाचत असतो. गोरगरीबांना साधी पाच-पन्नास रूपयांची रक्कमही दान केली तरी प्रसिध्दी करणारे अनेक लोक आज समाजात दिसतात. मात्र मानवी जीवनाला ज्या रक्ताची गरज आहे. ती भागविणारे हात आज कमी झाले आहेत. अनेक प्रकाराने जनजागृती करूनही रक्तदान करण्यासाठी कुणी सरसावत नाही. गडचिरोली या मागास जिल्ह्यात रक्ताची टंचाई वर्षभर जाणवते. अनेकदा रूग्णांच्या नातेवाईकांना रक्तासाठी भटकावे लागते. अशा परिस्थितीत जिल्हा सामान्य रूग्णालयाला व जिल्ह्यातील उपजिल्हा व ग्रामीण रूग्णालयांना वर्षाला ५५० बॅग रक्त पुरवठ्याची जबाबदारी सत निरंकारी मंडळाने आपल्या खांद्यावर घेतली आहे. नुसती जबाबदारी घेऊनच हे थांबलेले नाहीत. तर वर्षातून एकदा रक्तदान शिबिर आयोजित करून मोठ्या संख्येने रक्तदात्यांकडून रक्त जमा करून ते रूग्णालयामार्फत रूग्णांपर्यंत पोहोचविण्याचे पुण्यकर्म हे मंडळ १९८४ पासून करीत आहे. अद्यापही यांचा रक्तदानाचा हा महायज्ञ थांबलेला नाही, हे विशेष.अशी मिळाली प्रेरणा!संत निरंकारी मंडळाचे सद्गुरू गुरूबच्चनसिंग महाराज यांची २४ एप्रिल १९८४ रोजी हत्या करण्यात आली. या हत्येच्या विरोधात या मंडळाचे अनुयायी पेटून उठले. त्यांची समज घालताना गुरूबच्चनसिंग यांचे सुपूत्र हरदेवसिंग महाराज यांनी रक्ताचे पाट रस्त्यावर वाहण्यापेक्षा रक्तदान करून दुसऱ्यांचे जीव वाचवा, असा संदेश दिला. तेव्हापासून २४ एप्रिल हा दिवस ‘मानव एकता दिन’ म्हणून पाळला जातो. यादिवशी देशभरात रक्तदान शिबिरांचे आयोजन संत निरंकारी मंडळाच्या मार्फतीने केले जाते. याशिवाय इतरही दिवशी रक्तदान केले जाते. या मंडळात निरंकारी मंडळाचे अनुयायी रक्तदान करतातच. त्याचबरोबर इतरानीही रक्तदान करावे, याबाबत आठ दिवसांपूर्वीपासून जनजागृती केली जाते. यावर्षी देसाईगंज येथील रक्तदान शिबिरात ४३२ बॅग रक्त गोळा करून देण्यात आले. हा आजपर्यंतचा विक्रमी आकडा आहे. देसाईगंजबरोबरच कुरखेडा, गडचिरोली, अहेरी व ग्रामीण भागातही रक्तदान शिबिराचे आयोजन निरंकारी मंडळ करीत असते. हे सर्व करण्यासाठी संत निरंकारी मंडळाचे जिल्हा संयोजक आसाराम निरंकारी, क्षेत्रीय संचालक हरिषकुमार निरंकारी, कुरखेडाचे मुखी माधवदास निरंकारी, गडचिरोलीचे मुखी तुंकलवार, मंडळाचे स्वयंसेवक तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे यांच्यासह इतर अनुयायी सहकार्य करतात.