शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
3
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
4
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
5
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
6
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
8
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
9
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
10
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
11
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य
12
धक्कादायक! 'पंचायत' फेम आसिफ खानला हृदयविकाराचा झटका, म्हणाला- "एका क्षणात सगळं बदललं..."
13
एक कोटी रुपये कमाई, तरीही तो दु:खी, सोशल मीडियावर मांडली व्यथा, म्हणाला, पैसा आहे पण...   
14
५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत! आयुष्मान कार्ड अंतर्गत नेमके कोणते आजार येतात? लगेच तपासा!
15
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
16
Astro Tips: सगळं काही चांगलं आहे, तरी लग्न होत नाही; याला कारणीभूत ठरू शकते ग्रहदशा!
17
Olympics 2028: ऑलिंम्पिकचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठं रंगणार क्रिकेट सामने? A टू Z माहिती
18
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
19
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
20
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं

कोरडवाहू शेतीला संजीवनी

By admin | Updated: October 30, 2015 01:42 IST

आरमोरी तालुक्यातील देलनवाडी वन परिक्षेत्रात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत खोदतळी निर्माण करण्यात आल्याने या भागातील कोरडवाहू जमिनीला नवसंजीवनी मिळाली आहे.

देलनवाडी वनपरिक्षेत्र : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत मिळाली शेतकऱ्यांना पर्वणीजोगीसाखरा : आरमोरी तालुक्यातील देलनवाडी वन परिक्षेत्रात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत खोदतळी निर्माण करण्यात आल्याने या भागातील कोरडवाहू जमिनीला नवसंजीवनी मिळाली आहे. या भागातील धान पीक पावसाअभावी करपण्याच्या मार्गावर होते. परंतु अनेक ठिकाणी उभारण्यात आलेल्या खोदतळ्यांमुळे धान पिकाला वन विभागाने एक प्रकारची पर्वणीच दिली आहे. देलनवाडी वनपरिक्षेत्रातील कढोली गावालगतच्या जंगलात शेतालगत वनविभागाच्या वतीने खोदण्यात आलेल्या खोदतळ्याने दुष्काळाच्या परिस्थीतत पाणी मिळाल्याने या परिसरातील धानपिकाला दिलासा मिळाला आहे. देलनवाडी वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी अनिल साळवे यांनी स्वत: जंगलाच्या भूभागाचे सर्वे करून खोदतळे बांधण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला. कढोली परिक्षेत्रात सहा खोदतळी खोदण्यात आली. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे तलाव व बोडी अपूर्ण भरल्या होत्या. सदर जलसाठे पीक निघण्यापूर्वीच कोरडे पडले. मात्र कढोली येथील शेतकऱ्यांनी वनविभागाच्या वतीने खोदलेल्या खोदतळ्यांच्या पाण्याचा वापर करून धान पीक वाचविले आहे. त्यामुळे हातून गेलेले धानपीक वाचले आहे. सध्य:स्थीतीत खोदतळे रिकामे झाले असले तरी पाऊस आल्यानंतर सदर खोदतळे भरून उन्हाळ्यात वन्यप्राण्यांची तहान भागविणार आहेत. त्यामुळे सदर खोदतळे शेतकऱ्यांबरोबरच वन्यप्राण्यांनाही नवसंजिवणी देणारे ठरले आहे. या खोदतळ्यांमुळे भूजल पातळीतही वाढ होण्यास फार मोठी मदत झाली आहे. याबाबत कढोली येथील शेतकरी सूरज चौधरी, महादेव सहारे, युवराज ठाकरे यांनी वन विभागाच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे. (वार्ताहर)