शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

रेती अवैधरीत्या उत्खनन करणारे नऊ ट्रॅक्टर पकडले

By admin | Updated: May 23, 2016 01:28 IST

मिळालेल्या माहितीच्या आधारे गडचिरोलीचे तहसीलदार दयाराम भोयर यांनी पुलखल येथील वैनगंगा नदी घाटावर

तहसीलदारांची कारवाई : ४८ हजारांचा दंड वसूल; महसूल कर्मचाऱ्यांनी रात्रभर केली गस्तगडचिरोली : मिळालेल्या माहितीच्या आधारे गडचिरोलीचे तहसीलदार दयाराम भोयर यांनी पुलखल येथील वैनगंगा नदी घाटावर धाड टाकून रेतीचे अवैधरीत्या उत्खनन करणारे नऊ ट्रॅक्टर रविवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास पकडले. या ट्रॅक्टरधारकांकडून त्यांनी एकूण ४८ हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे.गडचिरोलीनजीकच्या पुलखल येथील वैनगंगा नदी घाटावर गेल्या अनेक दिवसांपासून रेतीचे अवैधरित्या उत्खनन व वाहतूक होत होती. याबाबतची माहिती तहसीलदार भोयर यांना मिळाली. या आधारे तहसीलदार भोयर यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह शनिवारी रात्री पुलखल नदी घाटावर धाड टाकली. त्यांनी रात्री जागून काढली. त्यानंतर रविवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास येथून त्यांनी रेतीचे अवैधरीत्या उत्खनन करणारे चार ट्रॅक्टर जप्त केले. यातील काही ट्रॅक्टर रिकामे होते. तर काही ट्रॅक्टरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक रेती भरण्यात आली होती. तहसीलदार भोयर यांनी ट्रॅक्टरधारकांकडून एकूण ४८ हजार ६०० रूपयांचा दंड वसूल केला. रेतीचे अवैधरीत्या उत्खनन व वाहतूक करणारे या प्रकरणातील ट्रॅक्टर कनेरी व कोटगल येथील असल्याची माहिती आहे. इतर रेतीघाटावरूनही अवैधरित्या मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन व वाहतूक केल्या जात आहे. (स्थानिक प्रतिनिधी)तीन दिवसात १७ कारवायागडचिरोलीचे तहसीलदार दयाराम भोयर यांनी गेल्या तीन दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकून अवैधरीत्या रेती, गिट्टी व इतर गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या १७ वाहनधारकांवर कारवाई केली. या वाहनधारकांकडून एकूण १ लाख २८ हजार रूपयांचा दंड वसूल केला. तहसीलदारांच्या या कारवाईमुळे कंत्राटदाराचे धाबे दणाणले आहेत.