शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

याही वेळी उसेंडींना बसणार फटका?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 00:09 IST

लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता जोमात आला आहे. मोठ्या नेत्यांच्या सभांनाही सुरूवात झाली आहे. अशा स्थितीत कोणतीही हयगय झाल्यास उमेदवारांना नुकसान सहन करावे लागू शकते. असे असताना काँग्रेस उमेदवार डॉ.नामदेव उसेंडी यांच्या कार्यपद्धतीने पक्षातील अनेक नेत्यांना आश्चर्यात टाकले आहे.

ठळक मुद्देनिष्क्रियता भोवण्याची शक्यता : मतदारांना गृहित धरल्यामुळे वाढली नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता जोमात आला आहे. मोठ्या नेत्यांच्या सभांनाही सुरूवात झाली आहे. अशा स्थितीत कोणतीही हयगय झाल्यास उमेदवारांना नुकसान सहन करावे लागू शकते. असे असताना काँग्रेस उमेदवार डॉ.नामदेव उसेंडी यांच्या कार्यपद्धतीने पक्षातील अनेक नेत्यांना आश्चर्यात टाकले आहे. परंपरागत मतदारांना गृहित धरून त्यांच्या नेत्यांनाही डावलले जात असल्यामुळे त्यांच्या नाराजीचा फटका डॉ.उसेंडी यांना बसेल, अशी चर्चा सुरू झाली आहे.गडचिरोली-चिमूर मतदार संघात पाच उमेदवार रिंगणात आहेत. मात्र प्रमुख लढत भाजपचे अशोक नेते आणि काँग्रेसचे डॉ.नामदेव उसेंडी यांच्यातच आहे. ५ वर्षाच्या आमदारकीनंतर गेल्या लोकसभा निवडणुकीत उसेंडी यांना दणदणीत पराभव पत्करावा लागला होता. त्यांच्या आमदारकीच्या काळात गडचिरोलीला मंजूर झालेले महिला व बाल रुग्णालय, कृषी महाविद्यालय ही त्यांची नाही तर तत्कालीन पालकमंत्री आर.आर. पाटील यांची देण असल्याचे सांगत मतदारांनी त्यांना नाकारले होते. आता पुन्हा ते आपले नशिब आजमावत आहेत. मात्र मतदारांना आपल्या बाजुने करण्यात ते कमी पडत आहेत.सिरोंचा ते सालेकसा अशा ५०० किलोमीटरच्या या मतदार संघात त्या-त्या भागात प्रभाव असणारे काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी योग्य तो समन्वय ठेवणे गरजेचे झाले आहे. मात्र आपल्याला विश्वासातच घेतले जात नाही, असे खासगीत बोलून अनेक पदाधिकारी उसेंडी यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करीत आहेत. एवढेच नाही तर गठ्ठा मते असणाऱ्या विविध समाजाच्या नेत्यांमध्येही डॉ.उसेंडी यांच्या भूमिकेमुळे नाराजी दिसून येत आहे. त्यांना योग्य तो मान देण्याऐवजी गृहित धरले जात असल्यामुळे हे नेते कामाला लागलेले नाहीत. त्यांची नाराजी उसेंडी यांच्यासाठी नुकसानकारक ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.दक्षिण गडचिरोली भागात काँग्रेसची मदार बऱ्याच अंशी माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यावर आहे. ते काँग्रेसच्या प्रचारसभांमध्ये सक्रिय सहभागही घेत आहेत. पण विधानसभा मतदार संघात काँग्रेसचेच नेते प्रचारातून गायब आहेत. आधीच गेल्या पाच वर्षातील जनसंपर्काचा अभाव, त्यात नेत्यांना सोबत घेण्याचे कसब दिसत नसल्यामुळे त्याचा परिणाम मतदानावर होणार आहे.भाजप आणि काँग्रेसमधील प्रचार पद्धती पाहिल्यास भाजपचा प्रचार नियोजनबद्धरित्या सुरू असल्याचे दिसते, तर काँग्रेसच्या प्रचारात बºयाच अंशी ताळमेळ नाही. कार्यकर्त्यांवर योग्य ते नियंत्रण नसल्यामुळे ते भरकटत आहेत. त्यांना दैनंदिन सोयीसुविधा देतानाही हात आखडता घेतला जात असल्यामुळे कार्यकर्ते मन लावून काम करायला तयार नाहीत.हीच स्थिती राहिल्यास उसेंडी यांना याही वेळी फटका बसल्याशिवाय राहणार नाही, अशी चर्चा अनेक ठिकाणी ऐकायला मिळत आहे.वंचित बहुजन आघाडी बिघडवणार गणितमागासवर्गीय समाजाला भाजपपेक्षा काँग्रेस पक्ष नेहमीच जवळचा वाटत आला आहे. परंतू गडचिरोली जिल्ह्यात ओबीसी समाजाचे आरक्षण घटविण्याचा निर्णय आधी काँग्रेसच्याच काळात झाल्याने जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांवर ओबीसी समाजाची नाराजी आहे. भाजपच्या काळात हे आरक्षण पुन्हा घटले. ते पूर्ववत वाढविण्याचा प्रयत्न खासदार या नात्याने अशोक नेते यांनी केला, पण त्यात त्यांना यश आले नाही. अशा स्थितीत ओबीसी आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील मतदार बहुजन आघाडीकडे वळण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेस