लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ८ ते १४ एप्रिल या कालावधीत समता सप्ताह साजरा करण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने सर्व शाळा, महाविद्यालये व प्रशासकीय विभागाच्या सर्व कार्यालयांना दिले आहेत.८ एप्रिल रोजी समता सप्ताहाचे उद्घाटन होईल. उद्घाटनानंतर स्वाधार योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, सबलीकरण योजनेंतर्गत जमीन वाटप प्रमाणपत्रांचे वितरण, ९ एप्रिल रोजी सर्व शाळा, महाविद्यालय, निवासी शाळा, आश्रमशाळा, शासकीय व अनुदानित वसतिगृहांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील लघुनाट्य, प्रश्नमंजुषा, वादविवाद स्पर्धा आयोजित कराव्यात, १० एप्रिल रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी व सिव्हील सर्जन यांनी रक्तदान शिबिर घ्यावे, समता दूतांमार्फत ग्रामस्तरावर पथनाट्य, लघुनाटीका सादर कराव्यात, जिल्हास्तरावर तसेच विभागीय स्तरावरही या कार्यक्रमांचे आयोजन करावे, ११ एप्रिल रोजी कृषी स्वावलंबन योजना, रमाई आवास योजना, स्वधार योजना, स्टॅन्ड अप इंडिया, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामुहिक औद्योगिक प्रोत्साहन योजना, परदेश शिष्यवृत्ती योजना आदी बाबतची जनजागृती करावी, १२ एप्रिल रोजी सर्वच शासकीय कार्यालय, स्वयंसेवी संस्था, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यामधून स्वच्छता अभियान राबवावे, १३ एप्रिल रोजी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांमधील नामवंत लोककलावंत यांचे सामाजिक विषयावर प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करावे, १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त समता सप्ताह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 01:05 IST
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ८ ते १४ एप्रिल या कालावधीत समता सप्ताह साजरा करण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने सर्व शाळा, .......
डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त समता सप्ताह
ठळक मुद्देसामाजिक न्याय विभाग : ८ ते १४ एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रम करण्याचे निर्देश