शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

सॅल्यूट ! जीवाची बाजी लावून नक्षल्यांशी लढले, राष्ट्रपती पदकाने आयुष्याचे सोने झाले

By संजय तिपाले | Updated: August 14, 2024 15:36 IST

गडचिरोली पोलिसांचे शौर्य: १७ पोलिस अधिकारी- कर्मचाऱ्यांना पदक जाहीर

गडचिरोली : अतिशय खडतर परिस्थितीत जीवाची बाजी लावून नक्षल्यांशी दोन हात करत शौर्य गाजविणाऱ्या १७ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींचे शौर्य पदक जाहीर झाले आहे, तर एका पोलिस अधिकाऱ्याला गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक घोषित झाले. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ही आनंदवार्ता आली. त्यामुळे जिल्हा पोलिस दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

देशभरातील पोलिस दलात तसेच सशस्त्र दलात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना स्वातंत्र्य दिनानिमित्त सन्मानित केले जाते. यावर्षी सुद्धा राष्ट्रपतींनी देशभरात एकूण २०८ पोलिस शौर्य पदक व ६२४ गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर केले असून, त्यापैकी गडचिरोली पोलिस दलास १७ पोलिस शौर्य पदक व  गुणवत्तापुूर्ण सेवेसाठी एक पदक जाहीर झाले आहे. 

हे ठरले पदकाचे मानकरी... गडचिरोलीत अपर पोलिस अधीक्षक म्हणून सेवा बजावलेले व सध्या वाशिमचे पोलिस अधीक्षक असलेले अनुज तारे, उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, सहायक निरीक्षक राहुल  देव्हडे, उपनिरीक्षक दीपक औटे, विजय सपकाळ, हवालदार महेश मिच्चा, कोतला कोरामी, नागेशकुमार मादरबोईना, समय्या आसम, महादेव वानखेडे, विवेक नरोटे, मोरेश्वर पोटावी, अंमलदार कोरके वेलादी, कैलास कुळमेथे, शकील शेख, विश्वनाथ पेंदाम यांना राष्ट्रपतींचे पोलिस शौर्य पदक मिळाले असून, उपनिरीक्षक मधुकर नैताम यांना राष्ट्रपती यांचे गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक मिळाले आहे. शहीद उपनिरीक्षक धनाजी होनमाने यांना मरणोत्तर शौर्य पदक जाहीर झाले आहे.  

कापेवंचातील दोन, मोरमेट्टातील एका चकमकीतील शौर्याची दखल

सन २०१७ मध्ये मौजा कापेवंचा-कवठाराम, सन २०१९ मध्ये  मोरमेट्टा व सन २०२२ मध्ये कापेवंचा-नैनेर येथे झालेल्या पोलिस- माओवादी चकमकीमध्ये एकूण चार माओवाद्यांना कंठस्नान घालण्यास गडचिरोली पोलिस दलास यश प्राप्त झाले होते. वरील सर्व अधिकारी व अंमलदार यांनी सदरच्या चकमकीमध्ये केलेल्या यशस्वी कामगिरीची दखल घेऊन  राष्ट्रपती यांचे पोलिस शौर्य पदक जाहीर झाले. 

९६ जणांना पदोन्नतीची बक्षिसी यासोबतच स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंधेला ४१ हवालदारांना सहाय्यक फौजदारपदी व ५५ पोलीस नाईक अंमलदार यांना पोलिस हवालदार पदी पदोन्नती मिळाली आहे.  राष्ट्रपती पोलिस शौर्य पदक प्राप्त व पदोन्नती प्राप्त पोलिस अधिकारी व अंमलदारांचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल   यांनी कौतुक केले आहे.

चार वर्षांत दोनशेवर अधिकारी- कर्मचाऱ्यांना पोलिस शौर्य पदकयावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंधेला १८ पोलीस अधिकारी व अंमलदारांना राष्ट्रपती यांचे पोलिस शौर्य पदक व १ पोलिस अधिकारी यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक प्राप्त झाले होते. २०२४ मध्ये एकूण ३५ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना  राष्ट्रपती यांचे पोलिस शौर्य पदक व २ अधिकारी व अंमलदार यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक प्राप्त झाले आहे. मागील चार वर्षांत    जिल्हा पोलिस दलास एकूण ३ शौर्य चक्र, २०३ पोलिस शौर्य पदक व  गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ८ पदक प्राप्त झाले आहे.

टॅग्स :Presidentराष्ट्राध्यक्षGadchiroliगडचिरोली