शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

१२०० ग्रामसभांना तेंदू विक्रीत फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 23:56 IST

गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागातील लोकांची अर्थव्यवस्था अवलंबून असलेला तेंदू संकलन हंगाम यंदा कंत्राटदाराच्या उदासीनतेमुळे लांबणीवर पडला आहे. परिणामी पेसा क्षेत्रातील ग्रामसभा अडचणीत सापडल्या आहेत.

ठळक मुद्देपेसा क्षेत्रातील ग्रामपंचायती अडचणीत : कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागातील लोकांची अर्थव्यवस्था अवलंबून असलेला तेंदू संकलन हंगाम यंदा कंत्राटदाराच्या उदासीनतेमुळे लांबणीवर पडला आहे. परिणामी पेसा क्षेत्रातील ग्रामसभा अडचणीत सापडल्या आहेत. १ हजार २३७ ग्रामसभांपैकी केवळ सात ग्रामसभांच्या तेंदू युनिटची लिलाव प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडून या तेंदू युनिटची विक्री झालेली आहे. अद्यापही तब्बल १ हजार २३० ग्रामसभांचे तेंदू युनिट अविक्रीत राहिले असल्याची माहिती जि.प.च्या सूत्रांकडून मिळाली आहे.पेसा क्षेत्रांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात ३६३ ग्रामपंचायती आहेत. यामध्ये एटापल्ली तालुक्यात ३१, सिरोंचा तालुक्यात ३९, कुरखेडा ४४, कोरची २९, देसाईगंज ९, आरमोरी १७, गडचिरोली २६, धानोरा ६१, चामोर्शी ३८, मुलचेरा ११, अहेरी ३९ व भामरागड तालुक्यातील १९ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. २०१८ या वर्षात तेंदू संकलन करण्याबाबतचा ठराव १ हजार २२५ ग्रामपंचायतीने ग्रामसभेत पारीत करून सदर ठराव जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडे सादर केला आहे. एकूण ५४ ग्रामपंचायतींनी पर्याय १ ची निवड केली आहे. या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील तेंदू युनिटची लिलाव प्रक्रिया वन विभाग करणार आहे. त्याअनुषंगाने वन विभागाचे प्रयत्नही सुरू आहेत. पेसा क्षेत्रातील ८९० ग्रामपंचायतींनी पर्याय २ ची निवड करून तेंदू संकलनाचा निर्णय घेतला आहे. तसेच वनहक्क कायद्यान्वये २८१ ग्रामपंचायतींनी पर्याय २ ची निवड तेंदू संकलनासाठी केली आहे. जिल्ह्याच्या पेसा क्षेत्रातील ६६ ग्रामपंचायतींनी तेंदू संकलन करण्याबाबतचा प्रस्ताव तसेच ठराव पारित केला नाही. प्रस्ताव जि.प. प्रशासनाकडे सादरही करण्यात आले नाही. मात्र या ग्रामपंचायतीसुध्दा तेंदू संकलनाचे काम यंदा करण्याच्या तयारीत आहेत. त्या अनुषंगाने ग्रामसभांचे पदाधिकारी पुढाकार घेत असल्याची माहिती आहे. कुरखेडा तालुक्यातील एका ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात जंगल नसल्याबाबतची माहिती संबंधित ग्रामपंचायतीने जि.प.ला दिली आहे. भामरागड तालुक्याच्या पेसा क्षेत्रातील सहा ग्रामपंचायतीमधील गावे अतिदुर्गम भागात समाविष्ट आहेत. त्यामुळे येथे सुरक्षेच्या दृष्टीकोणातून तेंदू संकलनाचे काम करणे कठीण आहे. त्यामुळे येथे तेंदू संकलनाचे काम होणार नसल्याची बाबत संबंधित ग्रामपंचायतींनी जि.प.कडे सादर केलेल्या प्रस्तावात नमूद आहे.कंत्राटदारांनी तेंदू युनिटच्या लिलाव प्रक्रियेमुळे यंदा पाठ फिरविल्यामुळे अनेक ग्रामसभांचे तेंदू युनिटची अद्यापही विक्री झाली नाही. त्यामुळे ग्रामसभा व कंत्राटदाराच्या काय अडचणी आहेत. हे जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी २३ एप्रिल रोजी सोमवारला ग्रामसभांच्या पदाधिकाºयांची तेंदू लिलाव प्रक्रियेबाबत नियोजन विभागाच्या कार्यालयात कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेला जिल्हाधिकारी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी व उपवनसंरक्षक उपस्थित होते. गतवर्षीपेक्षा यंदा कंत्राटदाराकडून कमी दर मिळाला तरी तेंदू युनिट द्यावे, असा सल्ला देण्यात आला.या ग्रामसभांच्या तेंदू युनिटची विक्रीपेसा क्षेत्रातील देसाईगंज तालुक्यातील पाच ग्रामसभांची तेंदू लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली असून तेंदू युनिटची विक्री झाली आहे. तसेच आरमोरी तालुक्यातील डोंगरतमाशी (कोकडी) या दोन ग्रा.पं.ची लिलाव प्रक्रिया पूर्ण होऊन कंत्राटदाराने तेंदू युनिट खरेदी केले. तेंदू युनिटची विक्री झालेल्या देसाईगंज तालुक्यातील पाच ग्रामसभांमध्ये पिंपळगाव, विहीरगाव, डोंगरगाव, शिवराजपूर, कसारी आदींचा समावेश आहे. सदर ग्रामसभांना कंत्राटदाराकडून ६०० ते ६५० रूपये प्रती गोणी असा दर मिळाला आहे.