शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
4
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
5
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
6
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
7
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
8
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
9
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
10
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
11
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
13
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
14
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
15
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
16
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
17
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
18
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
19
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
20
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर

शाळांमध्ये सुरक्षा समितीसह, सखी सावित्री समिती होणार गठित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 13:50 IST

जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश : अधिकारी, केंद्रप्रमुखांसह मुख्याधापकांची आभासी बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा काही ठिकाणी घडलेल्या अनुचित प्रकारांवरून पुन्हा ऐरणीवर आलेला आहे. असे प्रकार यापुढे घडू नयेत, यासाठी शाळांमध्ये सुरक्षा समितीसह सखी सावित्री समिती गठित करून तक्रार पेट्या बसविल्या जाणार आहेत. यासंदर्भातील निर्देश जिल्हाधिकारी संजय दैने यांनी गुरूवारी पार पडलेल्या मुख्याध्यापकांच्या आभासी बैठकीत दिले.

मुलींच्या सुरक्षेसंदर्भात उपाययोजना करण्याच्या दृष्टीने शासन निर्णय निर्गमित केलेले आहेत. या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी दैने यांनी जिल्ह्यातील सर्व खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, आदिवासी विभागांतर्गत आश्रम शाळा, समाजकल्याणच्या आश्रम शाळा आदींच्या मुख्याध्यापकांची आभासी पद्धतीने बैठक घेतली. दरम्यान, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी शासन निर्णयातील तरतुदी स्पष्ट करून राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाच्या वेबसाइटबाबत आणि त्यातील सुविधांबाबत माहिती सर्व शाळांमध्ये नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्याची सूचना दिली.

मुख्याध्यापकांवर होणार शिस्तभंगाची कारवाई शाळांमध्ये तक्रार पेटी बसविली जाणार आहे. वेळोवेळी तक्रार पेटी उघडून प्राप्त झालेल्या तक्रारीवर कार्यवाही करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास मुख्याध्यापकांना जबाबदार धरून शिस्तभंगाची कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.

तर शाळेची मान्यता होणार रद्द 

  • जिल्ह्यातील सर्व शाळा व शाळेच्या परिसरात एक महिन्याच्या आत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, या बाबीचे पालन न झाल्यास शाळेचे अनुदान रोखणे, शाळेची मान्यता रद्द करणे, आदी कारवाई केली जाणार आहे. 
  • शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने काळजी घेणे, चारित्र्य पडताळणीकरून पोलिसांकडून अहवाल घेणे, सहा वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्राधान्याने महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे.

दारू पिऊन शाळेत जाणे पडणार महागात शाळेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शाळा व्यवस्थापनाने तर दक्ष राहणे आवश्यकच आहे. सोबतच शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी किवा अन्य कोणतीही व्यक्ती शाळेत दारू पिऊन येणार नाही, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे निर्देश मुख्याध्यापकांना देण्यात आले.

अनुचित घटना दडविल्यास... शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत अनुचित प्रकार उघडल्यानंतर संबंधित शाळा व्यवस्थापन, संस्था, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सदर बाब २४ तासांच्या आत कळवावी. सदर अशी अनुचित घटना दडवून ठेवल्यास संबंधित व्यक्ती, मुख्याध्यापक, संस्था गंभीर शास्तीस पात्र ठरतील.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली