शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण रूग्णालय समस्याग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 00:34 IST

येथील ग्रामीण रूग्णालयातील वैैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. तसेच येथे आरोग्यविषयक सोयीसुविधांचा अभाव आहे. त्यामुळे या समस्यांकडे लक्ष देऊन त्या तत्काळ सोडवाव्या, अशी मागणी जि. प. सदस्य सारिका आईलवार व नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : समस्या सोडविण्याची लोकप्रतिनिधी व नागरिकांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : येथील ग्रामीण रूग्णालयातील वैैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. तसेच येथे आरोग्यविषयक सोयीसुविधांचा अभाव आहे. त्यामुळे या समस्यांकडे लक्ष देऊन त्या तत्काळ सोडवाव्या, अशी मागणी जि. प. सदस्य सारिका आईलवार व नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.पं. स. उपसभापती नीतेश नरोटे यांनी गुरूवारी ग्रामीण रूग्णालयाला भेट देऊन पाहणी केली असता, येथे अनेक समस्या आढळून आल्या. ग्रामीण रूग्णालयातील वैैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रुंगारे व डॉ. उगडे अनेकदा गैरहजर राहतात. त्यांची एटापल्ली येथे प्रतिनियुक्ती असल्याने रूग्णालय आरबीएसके डॉक्टरांच्या भरवशावर चालविले जात आहे. सदर डॉक्टर ग्रामीण रूग्णालयात काम करणार तर आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी कोण करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तालुका नक्षलग्रस्त, डोंगराळ भागात विस्तारला असल्याने बालमृत्यू, मातामृत्यूचे प्रमाण अधिक आहे. अनेक रूग्णांना रूग्णवाहिका मिळत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. एटापल्ली येथील डॉक्टरांची रिक्त पदे भरावी, रूग्णवाहिकेवर वाहनचालक नियुक्त करावे, शववाहिका उपलब्ध करावी, १०८ रूग्णवाहिका द्यावी, प्रयोगशाळा तंत्रज्ञाची पदे भरावी, नेत्र तपासणीकरिता डॉक्टर उपलब्ध करून द्यावे, एक्स-रे मशीनची सेवा उपलबध करावी, वॉटर फिल्टर सुविधा द्यावी, जेनेरिक औषधी केंद्र रूग्णालयात उपलब्ध करावे, येत्या १५ दिवसांत मागणी पूर्ण करावी, अन्यथा ग्रामीण रूग्णालयाला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा जि. प. सदस्य सारिका आईलवार, आविसंचे तालुकाध्यक्ष नंदू मट्टामी, आविसंचे जिल्हा सल्लागार प्रवीण आईलवार, नीतेश नरोटे, श्रीकांत चिप्पावार, मंगेश हलामी, रामा तलांडी, योगिता दुर्वा, अश्विनी आईलवार, पोवरी आत्राम, केशव कुळयेटी, बालू आत्राम, भिवा मट्टामी, तलांडे यांनी दिला आहे.