शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

आरक्षणासाठी आरमोरीत चक्काजाम

By admin | Updated: August 21, 2015 01:54 IST

जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्यात यावे, पुढील वर्षांसाठी जिल्ह्यात निवड मंडळ स्थापन करावे, .....

बुधवारी पाळला कडकडीत बंद : शिवसेना व युवासेनेचा पुढाकार; शेकडो युवकांची उपस्थितीआरमोरी : जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्यात यावे, पुढील वर्षांसाठी जिल्ह्यात निवड मंडळ स्थापन करावे, वर्ग ३ व वर्ग ४ च्या नोकर भरतीत सर्वच जातीच्या स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे, पेसा कायद्यातील जाचक अटी रद्द कराव्या आदी मागण्यांसाठी बुधवारी शिवसेना व युवा सेनेच्या वतीने आरमोरीत बंद पाळण्यात आला होता. त्यानंतर दुपारी १२ वाजता शहरातील बर्डी टी-पार्इंटवर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, उपजिल्हा प्रमुख अविनाश गेडाम व युवा सेना जिल्हाप्रमुख चंदू बेहरे यांच्या नेतृत्त्वात एक तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. त्यामुळे आरमोरी-नागपूर, देसाईगंज मार्गावरील वाहतूक ठप्प पडली होती. १६२ आंदोलनकर्त्यांना अटक करून सुटका करण्यात आली.बुधवारी शिवसेना व युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आरमोरी शहरात रॅली काढून आरमोरी शहरातील संपूर्ण बाजारपेठ बंद केली. दुकानदार, पानठेले चालक, व्यापारी, चहा दुकानदार यांनी सुद्धा बाजारपेठ १०० टक्के बंद ठेवून पाठिंबा दर्शविला. या आंदोलनाला सराफा असोसिएशन आरमोरी, किराणा दुकानदार संघटना व इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी सुद्धा पाठिंबा दर्शवून आंदोलनात सहभागी झाले. दुपारी १२ वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. ओबीसींना आरक्षण मिळालेच पाहिजे, पेसा कायद्याच्या जाचक अटी रद्द झाल्या पाहिजे, आदी बाबतच्या घोषणा देण्यात आल्या. तब्बल एक तास चाललेल्या आंदोलनामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. यानंतर पोलीस प्रशासनाने १६२ कार्यकर्त्यांना अटक करून त्यांची सुटका केली. आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य छाया कुंभारे, सुनंदा आतला, सकून नंदनवार, कालिंदा कडवे, मंजुळा पदा, कवडू सहारे, विजय मुरवतकर, प्रशांत सोनकुवर, उमेश गजपुरे, मधुसुधन चौधरी, किशोर मांदोळे, भरत जोशी, प्रशांत किलनाके, भूषण सातव, संतोष मारगनवार, दिनेश भडके, अक्षय धकाते, शैलेश चिटमलवार, अक्षय चाचरकर, मनोज बनपूरकर, किशोर कांबळे, गणेश खोब्रागडे, पंकज ठेंगरी, संदीप खागरे, तुषार खापरे, कुणाल भरणे, लोमेश खोडे, संजय लोणारे, स्वप्नील हेमके, प्रकाश गणवीर, पांडुरंग मेश्राम, आशिष जोध, नितीन जोध, केशव ठाकरे, रूपेश बेहरे, दीपक हेडाऊ, जयंत दहिकर, पंकज नाकाडे, वेगुनाथ काळबांधे, कोटू कुमरे, रूपेश खापरे, मयुर बेहरे, वैभव बेहरे, प्रवीण दुमाने, योगेश देवीकर, माणिक भोयर, अंकित तुमसरे, अविनाश डुंबरे, मिलींद खानदेशकर, भगवान गुरनुले, अक्षय बागडे, अंकित हेमके, पं. स. सदस्य नानू चुधरी, कालिदास सेलोटे, आनंदसिंग चावला, ज्ञानेश्वरी चुधरी, संकेत गजपुरे, यज्ञेश गांगवे, संकेत सेलोकर, रामदास पिल्लारे, धनराज खोब्रागडे, आशिष कांबळे, वसिम शेख, संदीप खागरे, नयन सेलोकर, घनश्याम कोलते, जीतू सानेटक्के, कुणाल प्रधान, ललीत मने, पराग बांगे, सचिन पराते, अमोल ढोंगे, विठ्ठल दुमाणे, मच्छिंद्र डोंगरे, मनोज राजगडे यांच्यासह शेकडो शिवसेना व युवा सेनेचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)